औरंगाबाद महाराष्ट्र

‘वा रे मोदी तेरा खेल…’; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवकचं परभणीत आंदोलन

परभणी |  वाढत्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवकने आज परभणीत आंदोलन केले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते.

देशात जर सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल कुठे मिळेत असेल तर ते परभणीत… म्हणूनच आम्ही इंधन दरवाढीविरोधात आंदोलनासाठी परभमी शहराची निवड केली असल्याचं मेहबुब शेख यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात आणि परभणी जिल्ह्यात विकास झाला नसून तो इंधन व महागाई वाढीत नंबर एकचा विकास झाला आहे. आणि म्हणून या उदासीन सरकारच्या चुकीच्या ध्येयधोरणामुळे महागाई वाढतच आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी युवकने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, या आंदोलनावेळी परभणी जिल्हा राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी सरकारचा महागाई आणि इंधनदरवाढीकरता निषेध केला आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी योग्य धोरणे आखण्याची मागणी केली.

IMPIMP