नेते सोडून गेले म्हणून राष्ट्रवादीने फोडले फटाके!

मुंबई |  ‘गेले ते कावळे राहिले ते मावळे…’; काळजी करू नका, युवा पिढी लढायला समर्थ आहे, अशा घोषणा देत सोडून गेलेल्या नेत्यांमुळे आम्हाला फरक पडत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी मुंबई राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडत ‘पवार साहेब तुम आगे बढो…हम तुम्हारे साथ हैं’… ‘लडेंगे… जितेंगे’, अशा घोषणांनी यावेळी परिसर दणादून सोडला होता.

इथून पुढच्या काळात कितीही कठिण परिस्थिती आली तरी त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शरद पवारांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभा राहू, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे सरकारने दरवर्षी २ कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे दिलेले आश्वासन हवेतच विरले, असा आरोप करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पवार साहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते घडवण्यासाठी मोठ्या जिद्दीने आणि नेटाने प्रयत्न करेन, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-ज्युनिअर आर. आर. पाटील म्हणतात; वेळ बदलते म्हणून ‘घड्याळ’ थांबत नाही…!

-शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी युवक’वर सोपवली ही मोठी जबाबदारी!

-नगरची जागा न सोडणं अंगलट; राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यात विखेंचा मोठा वाटा

-होय… खेकडे धरण फोडू शकतात!- आदित्य ठाकरे

-अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात ‘शिवस्वराज्य’ यात्रा; उदयनराजे असणार ‘स्टार कॅम्पेनर’!