नागपूर | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित दोन दिवसात समीर देशमुख यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं कळतंय.
राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख हे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहेत. सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुलगाच आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याने पक्षाला धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात अनेक धक्के बसले. त्यानंतर आता विदर्भातही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू झाल्याचं दिसत आहे.
विविध जिल्ह्यांमध्ये पडझड होत असताना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती तसंच उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाली.
आंबेडकरांची विधानसभेची रणनिती ठरली; काँग्रेस आणि एमआयएमबाबत घेतली ही भूमिका- https://t.co/JPhNUdU7Ls @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019
अमेरिकेनं एकादशीला यान सोडल्याने त्यांचा प्रयोग यशस्वी झाला- संभाजी भिडे- https://t.co/hzj8uZshOV #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019
“गेल्या 100 दिवसांत कोणतीही विकासकामं केली नाहीत, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन”- https://t.co/IOkVBvC8H2 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019