नागपूर महाराष्ट्र

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार; ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर???

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागला असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

अहेरीमधील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अहेरी विधानसभा मतदारसंघात आत्राम यांचा दौरा सुरु आहे. हा नेता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये विसावा घेणार असल्याचं समजतंय. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहेरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार भाजपची उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जातंय. असं असताना महाराष्ट्रातीस संभाव्य उमेदवारांच्या सर्वेक्षणात धर्मराव बाबा हे अहेरी मतदारसंघात आघाडीवर असल्याची माहिती आहे.

विधानसभा मतदारसंघात अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या तालुक्यात कार्यकारी मेळावा, आढावा बैठकी, जनसंपर्क अभियान आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रमाच्या माध्यमातून झंझावात सुरु आहे.

अहेरी मतदारसंघातील कार्यक्रमावर प्रदेश भाजपची नजर आहे. धर्मराव बाबा यांना पक्षात घेऊन विधानसभेची उमेदवारी देण्याबाबत विचारमंथन सुरु असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“खासदार आझम खान यांचे शीर कापून संसदेवर लटकवा”

-“साहेबांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील याचा अहिरांनी विचार केला का?”

-इस्लाम धर्मात लग्न हे जन्मोजन्मीच नातं नाही तर ते केवळ कॉन्ट्रॅक्ट- असदुद्दीन ओवैसी

-राष्ट्रवादीचा ‘हा’ नेतासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावर अजित पवार म्हणतात…

-निष्ठावंतांना डावललं तर वेगळा विचार करु; ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

IMPIMP