राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला खासदारालाही कोरोनाची लागण

परभणी | कोरोना महामारीमुळे सध्या सर्वत्रच चिंतेच वातावरण आहे. मोठ-मोठ्या अभिनेत्यांसह राजकीय नेतेही याच्या विळख्यातून सुटू शकले नाहीत. महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

फौजिया खान या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या माजी मंत्री आहेत. खान यांची परभणीमध्ये कोव्हीड-19 साठी ऍन्टीजन चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे अहवाल आता पॉझिटीव्ह आले आहेत.

परभणी जिल्हा प्रशासनानं फौजिया खान राहत असलेला परिसर सील केला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वचजणांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.

दरम्यान, शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांचीही कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. आत्तापर्यंत राज्यसरकार मधील पाच कॅबिनेट मंत्र्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. यापूर्वी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता हे सर्वजण बरे झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सभापती भडकले; ‘या’ कृत्यामुळे दिली समज!

आई-वडिलांची मुलीच्या डोळ्यासमोरच हत्या; मुलीनं ‘ऑन द स्पॉट’ असा घेतला बदला!

पुण्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये घडला धक्कादायक प्रकार; महिलेला सुरक्षारक्षकाने…

मराठा क्रांती पुन्हा उतरणार रस्त्यावर! आता ‘या’ मागणीसाठी उपसलं आंदोलनाचं हत्यार

“दोन भावांच्या राजवटीला आम्ही जुमणार नाही; भाजप सर्वांत विध्वंसक पक्ष”