पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane)यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. भर सभेत दत्तामामांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाच मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला.
इंदापूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते.
भाषणाची सुरुवात करताना राज्यमंत्री भरणे यांना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं.
माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी तात्काळ दत्तामामांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर दत्तामामांनीही आपली चूक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला. मात्र, दत्तामामा यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानं उपस्थितांमध्ये काही काळ खळबळ आणि हशाही पिकला.
भरणे यांनी सतत डोक्यात खूप विचार सुरु असल्याने होतं असं कधीकधी, असं म्हणत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दत्तामामा इंदापूरचे आमदार होते आणि त्यावेळी फडणवीसांनी इंदापूरसाठी विकासनिधी देताना कायम हात सैल ठेवला होता. त्यामुळेच भरणेंच्या तोंडी आजही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव आलं, अशीही चर्चा खासगीत रंगत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनाने हिरावून घेतली बापाची सावली, आता वडिलांच्या आवडत्या IPL टीमकडून खेळणार
केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा
“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”
“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका