एनडीटीव्हीचे पत्रकार कमाल खान यांचं दु:खद निधन

लखनऊ | एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आज सकाळी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी शेवटचा श्वास घेतला. ायचदक

कमाल खान हे लखनऊच्या बटलर पॅलेस येथील सरकारी बंगल्यात राहत होते. त्यांची पत्नी रुची कुमार या सुद्धा पत्रकार आहेत. कमाल खान हे एनडीटीव्हीत कार्यकारी संपादक होते. त्यांना रामनाथ गोयंका पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद जोशी यांनी खान यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. कमाल खान यांच्या अचानक जाण्याचा तीव्र धक्का बसला आहे.

कमाल आणि रुचीने माझ्यासोबत लखनऊमध्ये नवभारत टाइम्समध्ये काम केलं होतं. कमाल खान हे अत्यंत संतुलित पत्रकार होते. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.

कमाल खान यांनी 13 तासांपूर्वीच उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचं कव्हरेज केलं होतं. हा व्हिडिओ शेअर करत पत्रकार अमन शर्मा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

द लिजेंड कमाल खान यांचा शेवटचा पीटीसी. पीटीसीसाठी ते प्रसिद्ध होते. ही कालचीच गोष्ट आहे. आज ते आपल्यात नाहीत. जीवन इतकं चंचल आहे, असं शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कमाल खान यांना त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेसाठी रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला. त्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारानेही गौरविण्यात आलंय.

कमाल खान बातम्या सादर करण्याच्या शैलीसाठी खूप प्रसिद्ध होते आणि त्यांच्या शैलीचे आणि वार्तांकनाचं देशभरात कौतुक झालं होतं.

हरिद्वारमध्ये गंगेच्या काठावर अन्न आणि पाण्याचा त्याग करून बसल्याबद्दल जितेंद्र नारायण त्यागी यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी शेवटचं ट्विट केलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील ‘पम्मी तुम जिती मै हारा’ तेव्हाच…- करूणा मुंडे 

“चंद्रकांत पाटील सज्जन, निरागस आहेत पण त्यांनी…” 

चालत्या बसमध्ये बस ड्रायव्हरला फीट आली, महिलेने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक 

पुरूषांसाठी अत्यंत महत्वाची माहिती; ‘या’ अवयवावर होतोय कोरोनाचा परिणाम 

“दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?, कृपा करून…”