“40 दिवस झालं घरी बसलेत, उद्धव ठाकरेंची निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंद होईल”

मुंबई | भाजप नेते निलेश राणे (Neelesh Rane) यांनी पुन्हा एकदा मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. ते कुडाळमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

40 दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही असे मुख्यमंत्री(CM) महाराष्ट्राचा कामाचे नाहीत. त्यांचे आमदारच काय कामाचे आहेत? त्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्र्याच्या वार्ता करू नका. निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद इतिहासात झाली तर ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होईल, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

भाजप सगळ्या म्हणजेच चारही नगरपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्य मिळेल. आमचे सगळे नगरसेवक जिंकतील. आमच्या चारही नगरपंचायती मोठ्या फरकाने निवडून येतील याची मला खात्री आहे, असं निलेश राणे म्हणालेत.

विरोधकांनी किती भानगडी लावायचा प्रयत्न केला कितीही भांडणे लावायचा प्रयत्न केला तरी त्यांची उंची आणि अक्कल तेवढीच असल्याने ते फक्त भानगडी लावायचा प्रयत्न गेली दोन दिवसापासून करत आहेत. मात्र आमचे कार्यकर्ते जनतेला त्रास होऊ नये, निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी शांत राहून जनतेमध्ये राहून काम करत आहेत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

एवढ्या दिवस प्रचारामध्ये काय भाषण केलं? भाषणांमध्ये त्यांनी किती निधी आणला हे सांगता आलं नाही. शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगून उपयोग नाही. ते त्यांच्या पॅम्प्लेटमध्ये पाहिजे होतं. रस्त्यासाठी एवढं अमुक अमुक निधी, विकास कामांसाठी किती निधी आणला सांगू शकले नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काही उपयोग नाही, असं निलेश राणे म्हणालेत.

आपल्याला विकास हवा आहे. भांडण नकोयत. मात्र शिवसेना असेल किंवा विरोधक असतील त्यांना भानगड हवीये, विकास नकोय, हाच फरक आहे, असंही निलेश राणे यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“संप मागे घेतला नाहीतर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार” 

कोरोनामुक्त पुरुषांसाठी जास्त घातक ठरतोय Omicron?; संशोधनातून हैराण करणारी बातमी समोर 

“पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही” 

“सरकारने राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे शिल्लक ठेवली नाहीत” 

काँग्रेसची मोठी खेळी; ‘त्या’ 12 आमदारांना काँग्रेसचा दे धक्का?