“पक्षात 12 वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली?, लाथ मारा त्या खासदारकीला”

मुंबई | विधानसभा आमदारांमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करू असा पवित्रा शिवसेनेनं (Shiv Sena) घेतला आहे. यानंतरच छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं. आता यावरून  भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करत संभाजीराजेंना आवाहन केलंय.

कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात 12 वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

शिवसेनेच्या निमंत्रणाला संभाजीराजे छत्रपती काय प्रतिसाद देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी उद्या शिवसेनेत पक्ष प्रवेश नाही केला तर शिवसेनेच्या प्लान बी प्रमाणे कट्टर शिवसैनिकाला उमेदारी जाहीर करण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या प्लान बी प्रमाणे ग्रामीण महाराष्ट्रातील चार कट्टर शिवसैनिकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्र तयार असल्याची माहिती समोर आलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

“वसंत भाऊ तुझी राजसाहेबांना सांगण्याची कधी हिम्मत झाली नाही, आता…” 

केंद्र सरकार पाठोपाठ ठाकरे सरकारनेही घेतला मोठा निर्णय! 

‘तू कोण आहेस, गांधी की वल्लभभाई?’; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राज ठाकरेंच्या सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर