‘….हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई | पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी कार्डचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरून टीका करणाऱ्यांना देखील धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.

तुम्ही काय केलंत हिंदुत्वासाठी, राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा तुम्ही घेतलेला नाही, राम मंदिरचा आदेश हा कोर्टाने दिला आहे, यांनी तर मंदिर उभारण्यासाठी झोळी पसरली होती, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपचे नेते निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणेंनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

काल मुख्यमंत्री BEST आयोजित नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड कार्यक्रमाला गेले आणि राजकीय बोलून निघाले. कार्यक्रम काय आहे आपण काय बोलतोय कसं बोलतोय हे भान नसलेला महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय.

विरोधकांवर टीका करण्यासाठी व्यासपीठ राजकीय असावं हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलीये.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! राज ठाकरेंना झटका, सभेपूर्वी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल 

“माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो” 

अखेर Elon Musk यांनी विकत घेतलं ट्विटर, मोजले ‘इतके’ पैसे 

…म्हणून लोक भाजपला मतदान करतात- पृथ्वीराज चव्हाण 

“तुम्ही काय केलं हिंदुत्वासाठी?, बाबरी पडली तेव्हा तर तुम्ही बिळात लपला होतात”