“अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर”

मुंबई | ज्यांच्या नेतृत्वाखालील बँकेत सतीश सावंत काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला लगावला.

अजित पवारांनी केलेल्या टीकेला आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणेंनी या संदर्भात एक ट्विट करत अजित पवारांवर बोचरी टीका केली आहे.

राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याचं नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाझळतो. अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी अजित पवारांवर केली आहे.

अजित पवारांनी केलेल्या टीकेला नारायण राणेंनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेलं होतं, असं नारायण राणे म्हणालेत. ते सिंधुदुर्गात माध्यमाशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

कारभार करायला अक्कल लागते, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून होतं, असा टोला नारायण राणेंनी पवारांना लगावला.

महाविकास आघाडी सरकारमधील केलेल्या कारभारात किती अक्कल लावली आहे, हे जनतेला कळून चुकलं आहे, असं म्हणत नारायण राणेंनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे.

मी अजित पवार यांना 100 कोटी रुपये तरी देऊन जा म्हणालो. लघपाटबंधाऱ्याचं टेंडर काढलं नाही, 13 कोटी यायला पाहिजे होते, तिथे साडेसहा कोटी रुपये आले. त्यातील एकही पैसा खर्च नाही, असं नारायण राणेंनी सांगितलं.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

‘…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते” 

नितेश राणे अज्ञातवासात?, नारायण राणे म्हणतात… 

“…नाहीतर शशी थरूर यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल” 

‘मोहनदास करमचंद गांधीनं सत्यानाश केला’; कालीचरण महाराजाचं वादग्रस्त वक्तव्य 

विषारी साप मला तीन वेळा चावला, सापाने मला बर्थडे गिफ्ट दिलं- सलमान खान