मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली.
भाजपला ऐक्य नको आहे, हे शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं. ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं. देश किती मागे चाललाय हे आता आम्हाला कळत आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
पवार साहेब 25 वर्ष जे बोलले ते संजयला दोन वर्षापुर्वी कळू लागले, कळायला इतकी वर्ष लागली तर मग खरा चू… संज्या निघाला, असा घणाघात निलेश राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.
बाळासाहेब असते तर संज्याला ….. लाथ मारून हाकलून दिला असता कारण 25 वर्ष बाळासाहेबांच्या विचारांना काही अर्थ नव्हता असं म्हणायचं आहे संज्याला, अशी टीका निलेश राणेंनी केलीये.
दरम्यान, पवारांचे जे विचार 25 वर्षापूर्वी होते. ते आताही कायम आहेत. त्यांच्या विचारात काहीच बदल झालेला नाही. जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं हे पंताचं सरकार आहे. मुंबईतील जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका असं त्यांनी म्हटलं होतं. मुंबईतील मराठी माणसांची पकड कमी होऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं, असं राऊत म्हणालेत.
आमच्याकडे दारुगोळा खूप आहे, आम्ही तो वेळ आलो की फोडू. मी पवारांना दिल्लीत खुर्ची दिली. त्यावर टीका टिप्पणी होत आहे. मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायचं असेल तर त्यांची 61 भाषणं वाचली पाहिजे, असं ते म्हणाले.
25 वर्षांपूर्वी त्यांनी सांगीतलं भाजपला ऐक्य नको आहे. आम्हाला ते 2 वर्षांपूर्वी समजले. देश किती मागे चाललाय हे आम्हाला आता कळू लागलं आहे. आज प्रश्न विचारणाऱ्यांची स्थिती काय आहे हे सर्वांना माहीत आहे, असं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
“शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं”
“मोठा भाऊ म्हणून आम्ही आदर करू, पण हे खपवून घेतलं जाणार नाही”
राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
…फक्त त्याच कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब
जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट; पोतानिन यांच्या पत्नीने मागितलेली रक्कम ऐकून थक्क व्हाल