सिंधुदुर्ग | भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार दादऊचा माणूस आहेत की काय, अशी शंका उपस्थित केली आहे. सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत निलेश राणेंनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा. नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे, असा संशय मला येतो, असं ते म्हणालेत.
ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?, असा सवाल निलेश राणे यांनी विचारला आहे.
शरद पवारच नव्हे, तर सुप्रिया सुळे यांच्यावरही निलेश राणे यांनी टीका केली आहे. नवाब यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी जेवढी तत्परता दाखवली, तेवढीच काळजी अनिल देखमुखांच्या वेळी कुठे होती? असा सवालही निलेश यांनी उपस्थित केलाय.
नवाब मलिकांचा राजीनामा सरकारनं घ्यावा यामागणीसाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हल्लाबोल केला होता.
या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाचा आता नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरुनही वाद पेटण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी; मिळेल भलामोठ्ठा पगार
‘…तर तिसरं महायुद्ध अटळ आहे’; जो बायडन यांचं मोठं वक्तव्य
Russia Ukraine War: युक्रेनच्या ‘या’ नव्या दाव्यानं रशियाचं टेन्शन वाढलं
“आताच बसलोय, परत या”, सोशल मीडियावर आज दिवसभर फक्त ‘या’ व्हिडीओचीच चर्चा
नवरा असो किंवा बाॅयफ्रेंड मुली कधीच सांगत नाहीत ‘हे’ पाच सिक्रेट