“25 वर्ष मुंबईला लुटणाऱ्या ठाकरे कुटुंबाला जेल झालीच पाहिजे”

मुंबई | यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांच्या व्यवहाराची पोलखोल झाली आहे.

‘मातोश्री’ला 50 लाखांचं घड्याळ पाठवलं, अशा नोंदी आहेत. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी चलाखीने या विषयाला बगल देत डायरीतील ‘मातोश्री’ हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचं म्हटलं आहे.

आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला. आता यावरून भाजप नेते निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलीये.

मातोश्री वाल्यांना पैसे आणि गिफ्ट द्याल तरच पदं मिळतात हे परत एकदा सिद्ध झालं. ठाकरे कुटुंब तुरूंगात गेले पाहिजे तेव्हाच कळेल हे सगळे पैसे जमा करून ठेवले आहेत ती गुफा कुठे आहे, अशी टीका निलेश राणेंनी केलीये.

25 वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे, असा घणाघात निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

दरम्यान,आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांवर आयकर विभागाकडून करण्यात आलेली कारवाई शिवसेनेसाठी धक्का समजली जात आहे.

जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

‘महिला पुरुषांसोबत पार्कमध्ये दिसल्यास…’; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान 

झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य; रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपणार? 

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ मोठे नियम 

“देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात तेवढंच गोपीचंद पडळकर करतात” 

‘जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन’; एलोन मस्कचं वक्तव्य चर्चेत