‘मुख्यमंत्रीही असे मिळालेत की ज्यांना…’; निलेश राणेंनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

मुंबई | मुख्यमंत्रीही असे मिळालेत की ज्यांना महाराष्ट्र कळला नाही. विधिमंडळ कळले नाही. दोन वर्ष मुख्यमंत्री दिसले नाहीत, मेव्हणा पकडला गेला म्हणून मुख्यमंत्री बाहेर आले, अशी बोचरी टीका भाजप नेते निलेश राणेंनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काल भाषण केलं. त्यावरूनही निलेश राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली. विधानसभेतील मुख्यमंत्र्याचे भाषण नव्हते ते सेना भवनातलं भाषण होतं. बाबासाहेबांच्या भाषणाची क्वालीटी मुख्यमंत्र्यामध्ये नाही, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

टोमणे मारणे म्हणजे मुख्यमंत्र्याचे भाषण नसते. मुख्यमंत्र्याचे भाषण म्हणजे रटाळ कुजलेलं भाषण होतं. विरोधीपक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड केली. त्यात ते निरुत्तर झालेत, असंही त्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांनी लोकं टिंगल उडवायला लागलेत. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यासारखे बोलत नाही. ते दादरमध्ये असल्यासारखे बोलतात, अशी टीका निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलीये.

चोरी चकारी केली तर ईडी मागे लागणारच. यांनी चोरी केली तर हुकुमशाही… केंद्राचा दबाव असं म्हटलं जातं. मग नारायण राणेंना आठवड्याला तीन नोटिसा येतात. खोट्या केसेस दाखल केल्या जातात. तक्रार नसताना केस हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतंय. आपण काय करतो हे ठाकरे सरकारने पहावं, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! ईडीचा शिवसेनेला दुसरा झटका; ‘या’ नेत्याची संपत्ती जप्त 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर आणखी एक गंभीर आरोप 

…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं! 

सावधान! Omicron BA.2 व्हेरिअंटची दोन लक्षणं आली समोर, दिसताच डॉक्टरांकडे जा 

‘बायकोने ऑफिसमध्ये फोन करून चौकशी केली तर….’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय