देश

‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर

नवी दिल्ली | ‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘जेईई-मेन्स’ परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान घेतली जाणार असून वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा 26 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने वेळापत्रकाची घोषणा केली.

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज केलेल्या घोषणेमुळे जवळपास 25 लाख उमेदवारांचा जीव भांड्यात पडला. ‘कोरोना’च्या संकटकाळात देशभरातील सर्वच परीक्षा पुढे ढकलल्यामुळे वैद्यकीय प्रवेश इच्छुक उमेदवारांवर अनिश्चिततेचं सावट होतं.

केंद्र सरकारने 16 मार्चपासून देशभरातील विद्यापीठे आणि शाळा बंद करण्याची घोषणा केली होती. 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने नीट आणि जेईई परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या.

दरम्यान, देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा रविवार 26 जुलै रोजी होणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस सरकारने चालू केलेल्या अनेक योजना या संकटाच्या काळात प्रभावी ठरतायेत- अभिजीत बॅनर्जी

-कोरोनाच्या आकडेवारीत मोठा झोल आहे; निलेश राणेंचा आरोग्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

-काश्मिरमधील शहीदांच्या कुटुंबावरही कुणीतरी फुले उधळा- संजय राऊत

-“हिंदू मुस्लिम राजकारण करणाऱ्यांनी कालच्या हल्ल्यातलं इन्स्पेक्टर काझी यांचं बलिदान विसरू नये”

-“मोदी सरकार अपयशी; मात्र जनतेला पटवून देण्यात आम्हाला यश आलं नाही”