नीतू कपूरचा रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ व्हायरल…, पाहा व्हिडीओ

मुंबई | बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकि़ड्स एकमेकांना डेट करताना दिसतात. त्यामुळे डेटिंग करणे हे त्यांचासाठी काही नवखं नाही. त्यातच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशन बद्दल सतत सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. परंतु रणबीर आणि आलिया केवळ मिञ नसून त्यांच नात आता मैञीच्या पलिकडे गेलं आहे. आता त्यांच्या मध्ये अगदी लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आलिया आणि रणबीर लवकरचं लग्न करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतीये. तसेच त्यांचे चाहते देखील दोघांच्या लग्नासाठी अगदी आतूर झाले आहेत.

चाहत्यांसोबतचं रणबीरची आई नीतू सिंग सुद्धा आपल्या लाडक्या लेकाच्या लग्नासाठी आतूर झाली आहे. तसेच नीतू सिंगने आपल्या लेकाच्या म्हणजेच रणबीरच्या लग्नाची तयारी देखील चालू केलीये. नीतू सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या व्हिडीओमध्ये डान्सची रिहर्सच करताना दिसत आहे.

रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चिञपटामधील हे गाणं असून नीतू सिंग नृत्यावर रिहर्सल करत आहे. तसेच त्या रणबीर आणि आलियाच्या लग्नात संगीतचा कार्यक्रम ठेवणार आहे. त्यामुळे लग्नातील संगीतच्या कार्यक्रमात त्या डान्स करणार असून त्या त्याची रिहर्सल करतायेत.

राजेंद्र सिंग म्हणजेचं मास्टरजी हे नीतू सिंग सोबत डान्स करताना दिसत आहे. तसेच त्यांचा हा रिहर्सलचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालेला पाहायला मिळतो. परंतु हा व्हिडीओ ऑक्टोबर 2020 मध्ये व्हायरल झाले होता. त्या वेळी चाहत्यांनकडून आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा अंदाज लावला होता.

दरम्यान, रणबीर आणि आलियाच्या लग्नाची जरी तयारी सुरू झाली असली, तरी हे लग्न यावर्षी होणार नाहीये. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ब्रम्हास्ञ या चिञपटाच्या प्रदर्शनानंतर लग्न करणार असल्याचं सांगितले आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

जमिनीवर बसलेल्या बाळाला माकडानं घेतलं कुशीत…

“एखाद्याला बदनाम करण्याची फडणवीसांची जुनीच पद्धत…

अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली…

औरंगाबादच्या ‘या’ रुग्णालयात कोरोना रुग्णांचे…

मुंबईतील 60 वर्षे जुन्या ‘या’ वडापावची जोरदार…