मुलाखतीतील ‘या’ एका उत्तरामुळे नेहा बॅनर्जी झाली पहिल्याच प्रयत्नात IAS

मुंबई | IAS बनण्यासाठी यूपीएससी परीक्षा द्यावी लागते. IAS साठीच्या परीक्षेत पास होणे खूप अवघड आहे. इंटरव्यूवमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे खूपच भयंकर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोके पूर्णपणे चक्रावून जाते.

इतरांचे दुःख मोठे असते हा दृष्टिकोन ठेवला तर आयुष्य सोपं वाटेल, या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या कोलकत्त्याच्या नेहा बॅनर्जीने 2019 च्या युपीएससी परीक्षेत 20 वा क्रमांक मिळवला आहे. नोकरी करत असताना वेळ काढून परिक्षेची तयारी करणारी नेहा बॅनर्जी पहिल्या फेरीतच या परीक्षेत यशस्वी झाली आहे. मुलाखतीत तिला विचारलेल्या एका अवघड प्रश्नाला तिने सडेतोड उत्तर दिलं असल्याचं नेहाने एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे.

बुद्धिमत्ता आणि उच्च विचारांच्या आधारावर हे यश मिळवणाऱ्या नेहाचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. नेहा बॅनर्जी मुळची कोलकत्त्याची आहे. 2011 मध्ये तिच्या वडीलांचे नि.धन झाले होते. या आघाताने खचून न जाता तिच्या आईने एकटीनेच तिला वाढवले. अभ्यासात हुशार असणाऱ्या नेहाने आईच्या कष्टाचे चीज करत 2018 मध्ये आयआयटी खरगपूर इथून इंजिनिअरिंग पूर्ण केले .

नोकरी करतंच तिने या परीक्षेची तयारी केली आणि मुलाखतीच्या 15 दिवस आधी कंपनीला राजिनामा दिला. त्यामुळेच कदाचित ती मुलाखतीत अत्यंत आत्मविश्वासाने उत्तरे देऊ शकली. मुलाखतीत तिला विचारले होते की, विज्ञान आणि धर्म यात महत्त्वाचे काय आहे ?

त्यावर हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत, असं उत्तर तिने दिले होते. तेव्हा मुलाखतकर्त्यांनी विचारलं की, विज्ञान हे तर्कावर आधारीत आहे आणि धर्म हा आपल्या विश्वासावर आधारित आहे. तुम्ही काय महत्त्वाचे मानता?

यावर उत्तर देताना नेहा म्हणाली की, या दोन्हींची भूमिका वेगवेगळी आहे. या दोन्ही विषयांना एकत्र करण्याची काय गरज आहे. विज्ञान आपल्याला एका वेगळ्या दिशेने पुढे नेते तर धर्म एक वेगळी ताकद देतो.

यूपीएससीतील यशाविषयी बोलताना नेहा सांगते की, या परीक्षेची तयारी करताना माझ्यावर इंजिनीअरिंगची देखील जबाबदारी होती. त्यामुळे मी थोडी काळजीत होते. सुरुवात मी वर्तमानपत्रं वाचण्यापासून केली.

मला आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नव्हतं. त्यामुळं नोकरी चालू ठेवूनच या परीक्षेची तयारी केली आणि अखेर ध्येय साध्य केलंच. अभ्यासक्रम समजून घेऊन व्यवस्थित नियोजन करून कठोर परिश्रम केले तर ही परीक्षा सहज उत्तीर्ण होता येते, असा सल्ला नेहाने यावेळी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

डॉ. शितल आमटे प्रकरणाचा घातपाताच्या दिशेने तपास, पोलिसांनी तब्बल ‘इतक्या’ जणांचे जबाब नोंदविले

अर्णव गोस्वामिंच्या अडचणीत वाढ! ‘या’ पुराव्यांसह 1914 पानांचं आरोपपत्र दाखल करत रायगड पोलिसांची मोठी कारवाई

कंगनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, सोशल मिडीयावर झाली प्रचंड ट्रोल; पहा व्हिडिओ

‘…पण केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही’; चंद्रकांत पाटलांचं पवारांना सडेतोड प्रत्युत्तर

कालंच राष्ट्रवादीकडून आमदारकी मिळवलेला ‘हा’ आमदार भाजपच्या गोटात?