मनोरंजन

नेहा धुपिया आणि अंगदने झाकून ठेवलं होतं, मात्र गुपित अखेर फुटलंच!

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीसोबत नुकताच विवाह केला आहे. दोघांनी अत्यंत घाईघाईत लग्न उरकलं होतं. या घाईघाईत उरकलेल्या लग्नाचं गुपित आता उघड झालं आहे. नेहा धुपिया खरोखर गरोदर असल्याचं समोर आलं आहे. दुसरं तिसरं कुणी नव्हे तर खुद्द नेहा धुपियानेच ही माहिती सर्वांसमोर उघड केली आहे. तिने एक ट्विट केलं आहे.

काय आहे नेहा धुपियाचं ट्विट?

नेहा धुपियानं केलेल्या ट्विटमध्ये तिनं सर्वांना गुड न्यूज दिली आहे. ट्विटमध्ये तिनं काही फोटो टाकले आहेत. Here’s to new beginnings असं या ट्विटमध्ये म्हटलंय. नेहा गरोदर असल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. नेहाचे बेबी बंप या फोटोंमध्ये पहायला मिळत आहे. सोबत तिचा पती अंगद बेदीसुद्धा आहे. दोघेही अत्यंत आनंदी असल्याचं या फोटोंमध्ये दिसतंय. 

लग्नावेळी काय होती चर्चा?

अभिनेत्री सोनम कपूरने आनंद आहुजासोबत लग्न केलं. त्यानंतर लगेचच नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत लग्न केलं होतं. अत्यंत घाईने उरकलेल्या या लग्नाची फिल्म इंडस्ट्रीसह देशभरात चांगलीच चर्चा रंगली होती. नेहा धुपिया गरोदर असल्यानं दोघांनी घाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला, अशा बातम्या माध्यमांनी त्यावेळी दिल्या होत्या. या बातम्या खोट्या असल्याचं नेहाच्या वडिलांनी म्हटलं होतं. त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमांमध्ये देखील अंगदने असा काहीच प्रकार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र असं असलं तरी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वावरताना नेहा धुपिया ढगळ कपडे वापरत होती. त्यामुळे नेहाचं गुपित सर्वांना कळून चुकलं होतं. नेहाने मात्र अद्याप या गोष्टीचा जाहीर खुलासा केला नव्हता. 

IMPIMP