लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यांत बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करत नेहा म्हणाली…

मुंबई |  प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमीच आपल्या गाण्याने लोकांची मनं जिंकत असते. काही दिवसांपूर्वीच नेहा विवाहबंधनात अडकली आहे. पंजाबी गायक रोहनप्रित सिंग याच्याबरोबर आॅक्टोबर महिन्यात नेहाने लग्न केलं आहे. नेहा सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टीव्ह असते. ती सोशल मीडियावरून सतत काही न काही शेअर करत असते.

नेहाने नुकतंच सोशल मिडीयावर बेबी बंप सोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोत नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग दोघे दिसत आहेत. खयाल रखा कर, असा कॅप्शन नेहाने या फोटोवर दिला आहे. नेहाचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट करत अनेकांनी नेहा आणि रोहनप्रीचं अभिनंदन केलं आहे. कॉमेडीयन कपिल शर्मा पासून ते हर्षदीप कौरपर्यंत अनेक बड्या कलाकारांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंग याने देखील या फोटोवर कमेंट केली आहे. अब तो कुछ ज्यादाही खयाल रखना पडेगा नेहु, असं रोहनप्रीतने या फोटोवर कमेंट करत म्हटलं आहे.

नेहाचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेहाने आज लगेच एका गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. यात देखील नेहा आणि रोहनप्रीतचा सेम फोटो आहे. हे पोस्टर या दोघांचं 22 डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘खयाल रखा कर’ या गाण्याचं आहे.

नेहाने या गाण्याचं पोस्टर शेअर करण्यापूर्वी नेहाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. काहीजण नेहा आणि रोहनप्रीतच्या फोटोवर कमेंट करत अभिनंदन करत होते. तर काहीजण नेहा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा करत होते.

दरम्यान, हे दोघे लग्नानंतर  हनिमूनसाठी दुबईमध्ये गेली होती. नेहा आणि रोहनप्रीत दुबईमध्ये भरपूर एन्जोय करत होते. या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी दुबईमधून अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या.

हे दोघेही सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत आपल्या चाहत्यांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत असतात. नेहा आणि रोहनप्रीतची जोडी चाहत्यांना देखील भरपूर आवडते. चाहते त्यांच्या फोटोला भरभरून प्रेम देत असतात.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी करण जोहरचं नाव समोर येताच कॉंग्रेस नेत्यांचा फडणवीसांवर हल्लाबोल!

5 आणि 10 रुपयांची ही नाणी विकून तुम्हीही कमवू शकता लाखो रुपये, वाचा सविस्तर

तुमच्यात ‘ही’ 5 लक्षणे दिसत असतील तर तुम्हालाही कोरोना होऊन गेलाय, असं समजा

…अशा प्रकारे भाजपचे आमदार फुटणार; अजित पवारांनी सांगितला ‘तो’ फॉर्म्युला

“शरद पवारांचा पंटर, खबऱ्या आणि चमचा…”