नेहा कक्कर लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? व्हिडीओतून झालं अघड

मुंबई | बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग हे दोघे काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या विवाहानंतर चाहते चांगलेच खूश झाले होते.

लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात नेहाने बेबी बम्प फ्लॉन्ट करत चाहत्यांना संभ्रमात टाकले होते. यावेळी माध्यमांमध्ये केवळ नेहाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा चालू होत्या. बॉलिवूड इंडस्ट्रीसह चाहत्यांना देखील यावेळी आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. मात्र, नेहाने ती गुगली टाकल्याच नंतर स्पष्ट झालं होतं.

अशातच आता पुन्हा एकदा नेहा कक्कर गर्भवती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नेहा आणि रोहनप्रीतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेहाने स्वतः पोस्ट केला आहे.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा तिचा पती रोहनप्रीत बरोबर डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना नेहा कक्करचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे नेहा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

तसेच नेहा अलिकडे कुठेही बाहेर फिरताना दिसत नाही. कोणत्याच कार्यक्रमाला देखील ती हजेरी लावत नाही. मात्र, नेहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.  सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा तिचा नेहमी प्रयत्न असतो.

‘इंडियन आयडल 12’ या रिऍलिटी शोमध्ये नेहा परिक्षक होती. मात्र, हा शो देखील तिने मध्येच सोडला. नेहाच्या जागी तिची मोठी बहीण सोनू कक्कर हा शो जज करताना दिसली. तसेच या शोच्या फिनालेमध्ये देखील नेहा दिसली नाही. यामुळे नेहाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे.

दरम्यान, नेहाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच रोहनप्रीत देखील याविषयी काहिही बोलला नाही. यामुळे नेमकं सत्य काय? हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

https://www.instagram.com/p/CSOqQfnBmRb/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

महत्वाच्या बातम्या-

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरंच विवाह बंधनात अडकणार? अभिनेत्रीची टीम म्हणाली…

‘कोणीतरी आम्हाला वाचवा!’; अमेरिकन सैन्यापुढे अफगाणी महिलेचा आक्रोश, पाहा व्हिडीओ

‘या’ अभिनेत्रीच्या मोहक रूपानं चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

धाडस करत चक्क तरूणीने पकडला भला मोठा साप; होतयं सोशल मीडियावर कौतुक, पाहा व्हिडीओ

भर लग्न मंडपात तरूणीने नवरदेवाला चांगलाच बदडला, पाहा व्हायरल व्हिडीओ