मुंबई | आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) नुकतीच सुरूवात झाली आहे. या सिझनमधील 6 सामने खेळून झाले आहेत. लिलावानंतर आता सर्व संघ ताकदवान दिसत आहेत.
सर्व संघाचा एक एक सामना झाला आहे. त्यामुळे आता संघातील खेळाडूंची ओळख आता सर्वांना बऱ्यापैकी झाली आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याने मोठं वक्तव्य केलं आहे.
चेन्नईने गेल्या मोसमातही आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मात्र, यावेळी पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 6 गडी राखून पराभव केला. त्यामुळे आता चेन्नईचा संघ यावेळी कमकुवत असल्याचं बोललं जात आहे.
असं असलं तर मॅथ्यू हेडनने चेन्नईवर विश्वास दाखवला आहे. आयपीएल 2022 मध्ये कर्णधार बदलूनही चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपद पटकावू शकतो, असा विश्वास मॅथ्यू हेडनने व्यक्त केलाय.
पहिल्या सामन्यातील पराभवामुळे चेन्नईचा संघ निराश झालेला नाही. या सामन्यातही संघासाठी अनेक सकारात्मक गोष्टी समोर आल्या, असं हेडन म्हणाला.
संघाच्या अव्वल फळीतील फलंदाजीत काही उणिवा होत्या पण या संघात अनुभवाची कमतरता नाही आणि मला आशा आहे की ते त्यांच्या दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करतील, असा विश्वास देखील हेडनने दाखवला आहे.
दरम्यान, आजच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी करत 211 धावसंख्या उभी केली आहे. त्यामुळे आता चेन्नईचा संघ कमबॅक करेल, असा विश्वास चेन्नईचे समर्थक करत व्यक्त करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022: “RCB जिंकली तरी मला आनंद होणार नाही”; किंग कोहलीच्या वक्तव्यानं खळबळ
Nitin Gadkari: इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ठाकरे सरकारने दिलं गुडीपाडव्याचं खास गिफ्ट
पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ आदेश
Raj Thackeray: “आठवावे रुप…हिंदूस्वरुप!”, राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा टीझर रिलीज