ना ऋषभ ना राहुल, संजय मांजरेकर म्हणतात ‘हा’ खेळाडू कॅप्टन होणार

मुंबई | विराट कोहलीने (Virat kohli step down as captain) रविवारी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय (BCCI) असा वाद निर्माण झाल्याचं समोर आलं होतं.

विराटच्या घोषणेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता बीसीसीआय भारतीय कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे.

नव्या कर्णधारासाठी आता भारताचा स्टार क्लासी फलंदाज के एल राहुल याच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे भारताचा धाकड फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतचं देखील नाव समोर येत आहे.

या दोन्ही खेळाडूंच्या नावाची सध्या चर्चा सुरू असतानाच आता समालोकच आणि माजी भारतीय खेळाडू संजय मांजरेकर यांनी एका वेगळ्याच खेळाडूचं नाव सुचवलं आहे.

मांजरेकर म्हणाले की, भारतीय क्रिकेटशी संबंधित प्रत्येकासाठी कसोटी क्रिकेट अजूनही पवित्र आहे. त्यामुळे कर्णधारपद थेट ऋषभ पंत किंवा केएल राहुलकडे जाणार नाही, असं मांजरेकर म्हणाले.

कर्णधारपद ऋषभ किंवा राहुलकडं न जाता रोहित शर्माकडेच जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ऋषभ आणि राहुल दोन्ही  खेळाडू कर्णधारपदाच्या वेटिंग लिस्टवर असतील, असंही ते म्हणाले.

दरम्यान, रोहित शर्माच्या फिटनेसवर देखील मांजरेकरांनी वक्तव्य केलं आहे. रोहित शर्माला येत्या काळात फिटनेसवर जोर द्यावा लागेल, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“नाना पटोलेंना अटक करा”; वादग्रस्त वक्तव्यावर भाजपची आक्रमक भूमिका

 “झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”

 IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली

किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी