मुंबई | जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलला (IPL 2022) ओळखण्यात येतं. भारतीय क्रिकेट मंडळाकडून दरवर्षी आयपीएलचं आयोजन करण्यात येतं. अशातच आता 12 आणि 13 फेब्रुवारीला आगामी हंगामाआधी आता मेगालिलाव होणार आहे.
गेल्या आयपीएल हंगामात ख्रिस मॉरिस, पॅट कमिन्स, विराट कोहली यांसारखे खेळाडू खूप महागात विकले गेले. पहिल्या आयपीएल हंगामात म्हणजेच 2008 मध्ये महेंद्रसिंग धोनी हा सर्वात महागडा ठरला आहे.
पण आयपीएलच्या इतिहासात असा एक खेळाडू आहे ज्याला आयपीएल लिलावात 8 कोटी मिळाले आणि त्यानं फक्त एकच सामना खेळला आहे.
2019 मध्ये IPL लिलावात वरूण चक्रवर्ती पहिल्यांदा विकला गेला होता. पंजाब किंग्सच्या संघाने पहिल्यांदाच त्याच्यावर 8.4 कोटी रुपयांची बोली लावली होती.
आतापर्यंत वरुण चक्रवर्तीची आयपीएलमध्ये कोणतीही ओळख नव्हती. त्यानंतर देखील त्याला एवढी मोठी बोली लागली होती.
आयपीएल 2019 मध्ये वरुण चक्रवर्तीला पंजाब संघाने फक्त एकच सामना दिला होता. हा सामना कोलकाता नाईट रायडर विरुद्ध खेळला गेला. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 35 धावा देत फक्त एक विकेट घेतली.
या सामन्यानंतर वरुणलाही बोटाला दुखापत झाली होती, त्यानंतर तो पुढच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही आणि संपूर्ण हंगामात तो फ्कत एकच सामना खेळला.
दरम्यान, ज्या संघाविरूद्ध वरूण पहिली मॅच खेळला होता. त्या संघालात पुढील हंगामात तो सामिल झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ
आमदार नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार
मोठी बातमी! लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
‘या’ महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपणार; ICMR ने दिली महत्वाची माहिती
“तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर…”