मुख्यमंत्री कमी पडत आहेत असं मी म्हणालोच नाही- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कमी पडतंय असं वक्तव्य मी कुठेही केलेलं नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी केवळ मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला होता. माझं म्हणणं चुकीच्या पद्धतीनं मांडलं, असा खुलासा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय. नेतृत्व कमी पडतंय असं मी कुठंही म्हटलेलं नाही. प्रशासकीय व्यवस्थेवर मी जरूर बोललो होतो. अनेक अधिकाऱ्यांकडं कुठलीही जबाबदारी नाही तर काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी आहे. असं न करता प्रत्येकाला जबाबदारी द्यावी असा सल्ला मी मुख्यमंत्र्यांना दिला होता, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

हे ताबडतोब व्हायला हवं, असंही मी म्हटलं होतं. हे सगळं रेकॉर्डवर आहे. ते कुणीही ऐकावं आणि निष्कर्ष काढावा, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, काळजीतून मी काही बोललो असेन तर त्यातून कुणी कमी पडतंय असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. खरंतर आघाडीमध्ये विसंगती आहे हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना झाल्याचं कळलं तेव्हाच मी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये…-जितेंद्र आव्हाड

-21 लाख कोटींच्या पॅकेजवर लक्ष ठेवण्यासाठी मोदींनी तयार केली टीम; ‘या’ पाच जणांवर दिली जबाबदारी

-‘या’ जर्मन कंपनीची चीनमधून एक्झिट; भारतात सुरू करणार प्रकल्प

-कर्नाटकात 31 मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरातसह चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही- येडियुरप्पा

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ