मंबई । गुगल हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारं सर्च इंजिन आहे. यावर जगातील कोणत्याही कोपऱ्यावरील माहिती ही आपल्याला फक्त दोन सेकंदात मिळत असते. पण काही गोष्टी Google वर सर्च केल्या तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो.
नुकताच असाच एक प्रकार समोर आला आहे. पीडित तरूणाने Google वर कॉल गर्ल सर्च केलं आणि त्यानंतर मिळालेल्या नंबर वर कॉल केला असता त्याच्या सोबत भयानक प्रकार घडला आहे.
तरूणाला भेटायला बोलवून गुन्हेगार महिलेने आपल्या मित्रांना बोलावून त्या तरूणाला बेदम मारहान केली. त्याच्या जवळील 3 हजार रोख रक्कम आणि 30 हजार ऑनलाइन ट्रान्सफर करायला लावले आहे.
या प्रकरणी पीडित व्यक्तीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती नवी दिल्लीतील रहिवासी असून तो सॅनेटायझरचा व्यवसाय करत असल्याचं समोर आले आहे.
त्या दिवशी तरूणाला पहिल्यांदा 2 वाजता रोहिणी सेक्टर 22 मध्ये बोलावण्यात आलं. तरूण त्या परिसरात पोहचताच त्यानंतर आरोपीने कॉल करून प्रेमनगर येथे यायला सांगितलं.
पीडित व्यक्ती तिथं येताच आरोपी मुलगी त्याला घेऊन पॉकेट-13 मधील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेली आणि आपल्या साथीदारांना देखील तेथंच बोलावलं.
काही वेळातच गुन्हेगार मुलीचे साथीदार तिथं आले आणि पीडित व्यक्तीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या खिशातील 3 हजार रूपये काढून घेतले.
त्यानंतर पीडित युवकाला आपल्या अकाउंटवर 30 हजार रूपये सोडण्यास सांगितले आणि पीडित व्यक्तीला हाकलून दिले. या प्रकरणी पीडित युवकाने विहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अद्याप एकही आरोपी सापडला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
फरहान-शिबानीच्या हळदीची एकच चर्चा, रिया चक्रवर्तीचा डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ
“किरीट सोमय्यांना वाॅचमनची नोकरी द्या, नाहीतर माळ्याची नोकरी द्या…”
विराटच्या RCBला मिळणार नवा कर्णधार; आता धोनीचा ‘हा’ भिडू सांभाळणार जबाबदारी
मुंबईच्या बोरिवली परिसरातील 24 मजली इमारतीला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती
Video: ‘ऊ अंटावा’नंतर समांथाचा आणखी एक डान्स व्हायरल; विमानतळावर नक्की काय झालं?