‘विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका’ ‘या’ अभिनेत्रीचा चाहत्यांना सल्ला, पाहा व्हिडीओ

मुंबई| प्रेम एक सुखद आणि चिरकाल टिकणारी भावना आहे. प्रेमाला कोणतीही बंधन नसतात. पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय ती व्यक्ती खरचं आपल्या सोबत कायम राहिल का? असा एकदा तरी विचार करण्याचा सल्ला अभिनेत्री निना गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. विशेष म्हणजे या सगळ्याबाबत अजिबात संकोच न करता त्या अतिशय खुलेपणानं आपल्या भावना आणि मतं मांडत असतात. आता असाच एक मनोगत मांडणारा नीना यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये त्यांनी मुलींना विवाहित पुरुषाच्या प्रेमात गुंतू नका असा सल्ला दिला आहे. याचबरोबर त्यांनी त्यांच्या वैसक्तिक अनुभवाविषयी देखील सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नीना सांगतात की, मुलींनी विवाहित पुरुषांच्या प्रेमात कधीच पडू नये. विवाहित पुरुष जेव्हा तरुण मुलींबरोबर जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बायकोबरोबर पटत नाहीत असं कारण ते देतात. मग तुम्ही घटस्फोट का घेत नाही असे जेव्हा त्यांना विचारले जाते तेव्हा ते म्हणतात हे सोपे नसते, किंवा मग मुलांचे कारण ते पुढे करत लग्न करणे टाळतात.

हे सगळे अनुभव मी घेतले आहेत, असे नीना सांगतात. त्या पुढे म्हणतात की म्हणूनच मी आजच्या तरुणींना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीमध्ये विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडू नका.

सुरुवातीची ओळख, त्यानंतर प्रेमात पडणं. फिरायला जाणं, एकत्र वेळ व्यतीत करणं इथपर्यंत हे नातं येऊन पोहोचतं. पुढे अर्थातच अपेक्षा वाढतात आणि तुम्ही जेव्हा ‘त्या’ व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा मात्र त्याचं उत्तर तुम्हाला हादरवणारं असतं.

लग्नाचा विषय निघाला तर तो पुरूष पाठ फिरवतो. म्हणतो मी या सर्व गोष्टी करू शकत  नाही. आपलं जे काही आहे ते  इथेचं थांबवूया. तो पुरूष तुमच्यासोबत राहण्यास नकार देतो, तेव्हा तुम्ही काय कराल? या सर्व परिस्थितींचा अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतला आहे. त्यामुळे निना गुप्ता यांनी लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका असा सल्ला दिला आहे.

या व्हिडीओच्या अखेरीस त्या चाहत्यांना सल्ला देतात, की कधीच विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका. मीसुद्धा हेच केलंय आणि त्याचे परिणामसुद्धा भोगले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे सांगतेय की असं करण्याचा प्रयत्न करू नका.

दरम्यान, नीना यांनी या व्हिडीओमध्ये आपले वैयक्तिक अनुभवही शेअर केले आहेत. नीना या एकेकाळी साऊथ आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू व्हिवियन रिचर्ड्ससोबत नात्यात होती. रिचर्ड्स हे आधीपासून विवाहित होते.

व्हिवियनसोबत नीना यांचं नातं बरंच चर्चेत राहिलं. 1989 साली नीना यांनी लग्न न करताच मुलगी मसाबाला जन्म दिला. नीना यांनी दीर्घकाळ एकट्यानेच मुलीचं पालनपोषण केलं. 2008 साली व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या विवेक मेहरासोबत त्यांनी लग्न केलं.

वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांना मसाबा ही मुलगी आहे. मसाबा गुप्ता प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून या मायलेकी विवियन रिचर्ड्ससोबत राहत नाहीत. रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या रिलेशनशिपने 80 च्या दशकापासूनच अनेकांचं लक्ष वेधलं होतं. त्या दोघांनी लग्न केलं नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

महत्वाच्या बातम्या – 

‘ही’ झाडं लावा आणि मच्छरांना पळवून लावा, वाचा…

‘…बादशाह को बचाने में कितनो की जान…

जाणून घ्या! केशर खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

गुन्हेगाराकडून पोलिसाला बेदम मारहाण, कारण ऐकूण तुम्हालाही…

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री…