ना रश्मिका ना प्रिया! नव्या ‘नॅशनल क्रश’ची सोशल मीडियावर एकच चर्चा

मुंबई | आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर सिनेक्षेत्रात झळकणारे अनेक चेहरे दिसत आहेत. सध्या सिनेक्षेत्र कोरोना काळानंतर कात टाकत आहे. अशात आता नवीन चेहऱ्यांची चर्चा चालू आहे.

काही वर्षांपूर्वी प्रिया वाॅरिअरनं सोशल मीडियावर जोरदार धिंगाणा घातला होता. प्रियाचा डोळा मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रिया रातोरात नॅशनल क्रश झाली होती.

प्रियानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधानानं तरूणाईला वेड लावलं होतं. आता प्रिया आणि मंधाना यांच्या जोडीला नवी नॅशनल क्रश आली आहे. तिची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

अॅमेझाॅन मिनी टीव्हीवर नवी वेब सिरीज आली आहे. या वेब सिरीजमध्ये ‘आध्या आनंद’नं आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना घायाळ केलं आहे. सध्या सर्वत्र आध्याच्या अभिनयाची चर्चा आहे.

आध्या आनंद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिणामी आध्याबद्दल अधिक जाणून घेण्याची अनेकांची इच्छा झाली आसेल. आध्याबद्दल सध्या अधिक प्रमाणात सर्च केलं जात आहे.

आध्या ही सिंगापूरची राहणारी आहे. आध्या आनंद मुळची भारतीय असली तरी ती आपल्या परिवारासह सिंगापूरमध्ये स्थायिक आहे. परिणामी आध्या आनंद ही एनआरआय आहे.

अगदी कमी वयापासून आध्यानं अभिनयाची वाट निवडली आहे. लहान वयापासून आध्या माॅडेलिंग करते. आध्या ही सध्या अवघ्या 17 वर्षाची आहे. तरीही तिच्या अभिनयात नाविण्यता आहे.

बाॅम्बे बेगम्समध्ये आध्यानं पुजा भट्टसोबत काम केलं आहे. तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतूक केलं आहे. ओटीटीवर तिची क्रश ही वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर आध्या आनंदी आहे.

सिंगापूरमधील टीव्ही शोमध्ये देखील आध्यानं काम केलं आहे. क्रश या वेब सिरीजमधील तिच्या मनमोहक अदांनी सर्वांना आध्याच्या प्रेमात पाडलं आहे. परिणामी आध्याला नॅशनल क्रश ही ओळख मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “त्यांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतला”, अंनिस वादाच्या भोवऱ्यात; अविनाश पाटील यांचे गंभीर आरोप

SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार

पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा

लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे 

श्रीमंत पक्ष ठरलेल्या भाजपकडे आहे इतकी संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल