लाईक, लव्ह अन् बरचं काही! व्हाॅट्सअॅपमध्ये झाला ‘हा’ महत्त्वाचा बदल

मुंबई | व्हाॅट्सअॅप हे दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. मोठ्या प्रमाणात एकमेकांना जोडण्याचं आणि संभाषणाचं साधन म्हणून व्हाॅट्सअॅपचा उपयोग होतो.

सातत्यानं या मॅसेजींग अॅपमध्ये बदल होत असतात. ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा पुरवण्याचा हेतुनं कंपनी बदलाचे निर्णय घेत असते.

कंपनी वाढत असलेल्या वापरकर्त्यांसाठी संशोधनातून आणि सुचनांमधून काही गोष्टी निवडते. त्याचा फायदा अधिक प्रमाणात चांगली सुविधा पुरवण्यासाठी होतो.

आताही व्हाॅट्सअॅपकडून काही बदल करण्यात आले आहेत. परिणामी एकमेकांना चॅटींग करताना आता अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

फेसबुक मॅसेंजर आणि इन्स्टग्राम मॅसेंजरमध्ये ज्या पद्धतीनं ग्राहकांना इमोजी वापरता येत होते. अगदी त्याच पद्धतीनं आता व्हाॅट्सअॅपमध्ये देखील इमोजी वापरता येणार आहेत.

व्हाॅट्सअॅपच्या इमोजी अपडेटची पहिली झलक ही बीटा व्हर्जनवर पहायला मिळाली होती. त्यानंतर आता अपडेटेड व्हाॅट्सअॅपवर या इमोजी वापरता येणार आहेत.

एकाच वेळी सहा इमोजी वापरत येणार आहेत. परिणामी लवकरात लवकर ग्राहकांनी आपलं व्हाॅट्सअॅप व्हर्जन अपडेट करण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही”; भाजप खासदार आक्रमक

 “काय अल्टिमेटम द्यायचा तो घरातल्यांना द्या”; अजित पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, एअर इंडियानंतर ‘ही’ कंपनीही विकली

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर 

रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; हादरवणारा प्रकार समोर