कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईतील कोरोना रूग्णांचा आकडा तर छातीत धडकी भरवणारा आहे. एकट्या मुंबई शहरातील कोरोना बाधीत रूग्णांनी ५० हजारांचा टप्पा पार केलाय. ही मुंबईत राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने नक्कीच चिंतेची बाब आहे.
भारताचं नवं वुहान बनत असलेल्या या शहराची संकटं कमी होण्याच्या मार्गावर नाहीत. कारण मुंबई शहरात कोरोना व्हायरसच्या प्राथमिक लक्षणांत अजून दोन लक्षणांची भर पडली आहे. या आजारांची लागण झाल्यास कोरोना संक्रमणात वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.
सर्दी, ताप, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होणे ही कोरोना संक्रमणाची प्राथमिक लक्षणं मानली जातात. दरम्यान तोंडाची चव जाणे, कसलाही वास घेता न येणे या नव्या लक्षणांची यामध्ये भर पडली. आता मात्र गॅस्ट्रोचा आजार झाल्यावरही कोरोना व्हायरसची लागण होत असल्याचं काही केसेस मध्ये आढळून आलं आहे.
कोरोना बाधीत रूग्णांना अशक्तपणा येणं, पोट बिघडणं ही नव्या स्वरूपाच्या लक्षणांची लागण होत आहे. जर या स्वरूपाची काही लक्षणं आढळून आल्यास त्वरित उपचार घेण्याचा सल्लाही डाॅक्टरांनी दिला आहे. यामुळे गॅस्ट्रो संबंधी आजार असल्यास निष्काळजीपणा न करता, योग्य उपचार घेणंच हिताचं ठरणार आहे. पावसाच्या वातावरणात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतो.
मुंबईत या काळात अनेक साथीच्या आजारांची लागण होत असते. गॅस्ट्रो व डेंग्यूची साथी तर दरवर्षी चालूच असतात. मात्र कोरोनाच्या लक्षणांत आता गॅस्ट्रोचीही लक्षणं आढळून आल्यानं नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील या साथींना तोंड देताना कोरोनाचा धुमाकूळ चालू असल्यानं मुंबईकरांना आता दुहेरी संकटाला सामोरं जावं लागणार आहे.
मुंबई शहर कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा हाॅटस्पाॅट ठरलं आहे. राज्यात लाॅकडाऊन शिथील केला जात असताना सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या झुंडी उडाल्या आहेत. कोरोनाचा मारा कमी म्हणून की काय आता पावसानेही आगमन केलं आहे. त्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे.
ऐरवी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मंडळींच्या मनात आता गॅस्ट्रो सारख्या साथीच्या आजारांनी धडकी भरली असावी. या कठीण काळात सोशल डिस्टंसिंग ठेवणं आणि आरोग्य प्रशासनाच्या नियमांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करणं या बाबीचं महत्व यामुळे अधिकच वाढणार आहे.
या प्रकारची तीव्र लक्षणं आढळून आल्यास कोरोना चाचणी करणंही गरजेचं आहे. दरम्यान कोरोना व्हायरसची चाचणी करायची झाल्यास खाजगी प्रयोगशाळेत आता फक्त २२०० रूपये मोजावे लागणार आहेत. जनतेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता हा दर कमी करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
महत्वाच्या बातम्या-
-उषा नाडकर्णी ढसढसा रडल्या, सुशांतच्या आठवणीने व्याकूळ!
-सुशांतच्या आत्महत्येला नवं वळण?; सुशांतच्या ‘या’ मैत्रिणीचा पोलीस जबाब घेणार
-असाही एक मुख्यमंत्री, स्वत:च्या सासऱ्यांचं निधन झालं असताना उद्धव ठाकरेंनी नियोजित बैठक घेतली!