कोरोनानंतर भारतीयांमोर नविन संकट! वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा

मुंबई | 2020 हे वर्ष सर्वांसाठीच धक्कादायक ठरलं आहे. या वर्षात कोरोना महामा.रीनं अक्षरशः सर्वांच्याच तोंडचं पाणी पळवलं आहे. कोरोना महामा.रीच्या पार्श्वभूमीवर भारतात मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अद्याप देखील पूर्णपणे हटविण्यात आला नाही.

लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. अशातच आता वैज्ञानिकांनी भारताला खूप मोठा इशारा दिला आहे.

2020 हे वर्ष संपायला दोन महिने असतानाच वैज्ञानिकांनी भारताला येत्या काळात खूप मोठ्या प्रलयाला सामोरं जावं लागेल, असा इशारा दिला आहे. भारतातील काही वैज्ञानिकांनी हिमालयातील पर्वतांच्या पृष्ठभागावरील मातीचं परीक्षण केलं आहे.

तसेच वैज्ञानिकांनी रेडिओकार्बन विश्लेषण देखील केलं आहे. यानुसार वैज्ञानिकांनी लवकरच पूर्ण हिमालय क्षेत्रात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवतील. यामुळे भारतात महाप्रलय येण्याची शक्यता आहे, असं सांगितलं आहे.

भूवैद्यानिक, भौगोलिक माहितीचा अभ्यासातून वैज्ञानिकांनी महाप्रलयाचा अंदाज वर्तवला आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या या माहितीमुळे अनेक लोक चिंताग्रस्त झाले आहेत. याबद्दलचा अहवाल ‘सिस्मॉलॉजिकल रिसर्च लेटर्स जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार यावर्षी हिमालयात प्रचंड पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान दरवर्षी होणाऱ्या सरासरी पावसापेक्षा यावर्षी 375% जास्त पाऊस झाला आहे. भारतीय उपखंडातील पावसाचे प्रमाण बदलत आहे. काही अंशी हवामान बदलल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये अतिवृष्टीच्या शक्येतेम्ध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

इंडिअन इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी खडकपूरमध्ये भारतात होणाऱ्या पावसाविषयी अभ्यास केला गेला होता. या अभ्यासाम्ध्ये जलविज्ञान शास्त्रज्ञांना असे दिसून आले की, दक्षिण भारत आणि हिमालय  क्षेत्रात मुसळधार पावसात लक्षणीय वाढ झाली आहे.

अलीकडच्या काळात भारतीय शास्त्रज्ञांनी हवामानाच्या पुर्वानुमनात चांगलीच प्रगती केली आहे. यामुळे धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना चेतावणी देवून त्यांचे नुकसान कमी होईल याकडे जास्त लक्ष दिले जाते. भारतीय वैज्ञानिक यावर आणखीही शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! आता सुशांतच्या बहिणीच गजाआड जाणार?

पंकजा मुंडे शिवसेना नाही तर राष्ट्रवादीच्या वाटेवर? पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं अनेकजण गोंधळात

सुशांत प्रकरणी दीपिकाला मोठा धक्का! ‘या’ व्यक्ती विरोधात होणार कारवाई

‘कुछ कुछ होता है’ मधील छोटा सरदार लवकरच करतोय लग्न! ‘ती’ आहे तरी कोण?

‘या’ बड्या अभिनेत्रीने पुन्हा उद्धव ठाकरेंवर केले धक्कादायक आरोप म्हणाली…