वेदांता फॉक्सकॉन हातातून गेल्यावर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई | वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राचे फार मोठे न भूतो असे सामाजिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठी जुंपली आहे.

या प्रकल्पाच्या जाण्याने जवळ जवळ दोन कोटी तरुण अप्रत्यक्षपणे बेकारच राहिले आहेत. तसेच यातून राज्य सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणाक महसूल गोळा होणार होता, तो देखील गेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत आता मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) केलेल्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठविली आहे.

उद्योग विभागाने केलेल्या छाननीअंती 181 भूखंड वाटपावरील स्थगिती उठविण्यात आली. दरम्यान अद्याप दहा प्रकल्पांची छाननी सुरु आहे. तसेच उर्वरीत प्रकरणांवर युद्धपातळीवर काम सुरु असून त्यासंबंधी देखील लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकांऱ्यांनी सांगितले.

विविध ठिकाणी आणि विविध प्रकल्पांसाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडांवर शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती आणल्यामुळे तब्बल 12 हजार कोटींचे प्रकल्प रखडले होते. त्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

सध्या शासनाकडे अनेक भूखंड संपादनाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावरील स्थगिती उठविण्याचे काम शासन करत असल्याने आगामी काळात राज्यात उद्योगांना चालना मिळाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

ममता बॅनर्जींची मोठे वक्तव्य; केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर पंतप्रधान मोदी करत नाहीत, तर भाजप…

“5 सप्टेंबरला अग्रवाल मोदींना भेटले आणि…” रोहीत पवार यांचे वेदांतावर मोठे वक्तव्य

आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला मोठा दणका; म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त दोन-अडीच…

वॉट्सएपचे नवीन अपडेट देणार आहे ‘हे’ नवीन फिचर्स; सर्वांना याचीच प्रतीक्षा होती

‘दारुच्या नशेत असल्याने…’; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप