Electric Vehicles घेत असाल तर थोडं थांबा, लवकरच येत आहेत या दमदार गाड्या; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | भारतीय ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कारची (Electric Vehicles) मागणी होत आहे. टाटा मोटर्स सध्या इलेक्ट्रिक बाजारात आपल्या कंपनीच्या 80% गुंतवणुकीबरोबर राज्य करीत आहे.

म्हणूनच या वर्षी भारतीय बाजारात आणखी इलेक्ट्रिक कार येणार आहेत. या बातमीत आपण येणाऱ्या गाड्यांविषयी जाणून घेऊया.

टाटा टियागो इलेक्ट्रिक कार (Tata Tiago EV) नावे टाटा मोटर्स लवकरच नवीन कार बाजारात आणणार आहे. ही टाटा मोटर्सची देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार असणार आहे.

या वर्षीच्या शेवटपर्यंत टाटा मोटर्स ही गाडी बाजारात आणणार असल्याची माहिती मिळत आहे. टाटा मोटर्स ही नवीन गाडी 26 KWH किंवा 30 KWH सोबत आणणार आहे. ही गाडी एकदा चार्चिंग केल्यानंतर जवळजवळ 300 किमी धाऊ शकते.

दुसरी गाडी जी टाटा मोटर्स (Tata Motors) बाजारात आणणार आहे ती आहे सिट्रोएन सी 3 इलेक्ट्रिक कार (Citron C3 EV). ही इलेक्ट्रिक कार म्हणजे टाटा मोटर्स C3 हैैचबॅकवर आधारीत असणार आहे.

टाटा मोटर्स ही गाडी डिसेंबर 2022 पर्यंत बाजारात आणणार आहे. ही गाडी देखील एकदा चार्जिंग केल्यानंतर 300 किमी पर्यंत मायलेज देणार आहे.

एम जी स्मॉल इलेक्ट्रिक कार (MG Small EV) या गाडीची बाजारात आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने या गाडीची चाचणी देखील घेण्यात येणार आहे. ही गाडी 2023 साली बाजारात येणार आहे. या गाडीची किंमत 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

“मुख्यमंत्र्यांना एकही गोष्ट माहित नाही, त्यांना पत्रकारांनी ट्रान्सहार्बरबद्दल प्रश्न विचारला आणि…” – आदित्य ठाकरेंची मोठी टीका

शिंदे समर्थक आमदाराची काँग्रेस शिवसेनेवर टीका करताना जीभ घसरली; विरोधकांची तुलना केली थेट…

“… तर नोटांवर देखील मोदींचे फोटो छापले असते” अहमदाबादमधील कॉलेजला मोदींच्या नावावरुन वाद

“मी श्रीमती केजरीवाल यांना हात जोडून सांगतो की…”; भाजप खासदारांची केजरीवालांच्या पत्नीला विनंती

मुंबईसह ‘या’ भागांत मोठा पाऊस; पुढील तीन ते चार तास तुफान पावासाची शक्यता