मुंबई | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील अनेक देशात थैमान घालायला सुरूवात केली आहे. अनेक देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा हात पाय पसरले आहेत.
भारतातील 14 राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला. अनेक राज्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याने प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे.
देशात सर्वात जास्त कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ बघता विमान प्रवाशांसाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जोखमीच्या आणि उच्च जोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना निर्बंध कठोर करण्यात आले आहेत.
जोखमीच्या देशातून आणि युरोपीयन देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणं सक्तीचं करण्यात आलं आहे. तर प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यास त्याला नियमित आरटीपीसीआर चाचणी घेण्यास सांगितलं जाणार आहे.
आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाची प्रवाशाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. संबंधित प्रवाशाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तर पुढचे 7 दिवस प्रवाशाला घरीच विलगीकरणात राहण्यास सांगितलं जाईल.
कोरोना अहवाल सकारात्मक आला आणि लक्षणे दिसत असतील तर त्या प्रवाशाला पालिकेच्या सेव्हन हिल्स रूग्णालयात ठेवलं जाईल. प्रवाशाला पैसे भरून खासगी रूग्णालयात जायचं असेल तर बॉम्बे हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचाराची सोय आहे.
प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह असूनही लक्षणे दिसत नसतील तर त्याला बीकेसी जम्बो कोविड सेंटर किंवा कांजूर जंबो कोविड सेंटरमध्ये ठेवलं जाईल. प्रवाशाला खासगीत पैसे भरून राहायचं असेल तर पालिकेने सूचीबद्ध केलेल्या खासगी हॉटेलमध्ये प्रवाशाला राहता येणार आहे.
दरम्यान, युरोपीयन देशांसह दक्षिण आफ्रिका, चीन, बोत्सवाना, न्युझीलंड, इस्त्राईल, घाना, हाँगकाँग, मॉरिशस, ब्राझील, झिंबाब्वे सारख्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त उपायांचे पालन करावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘कोरोनाची तिसरी लाट आली तर…’, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिला गंभीर इशारा
हजारोंची माय सिंधूताईंचा असा होता खडतर जीवनप्रवास!
महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! राज्याची आकडेवारी 18 हजाराच्या पार
महाराष्ट्र पोरका झाला! सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन
“जितेंद्र आव्हाडांविरोधात अॅट्राॅसिटी दाखल करा”; सदावर्तेंची आक्रमक मागणी