नाशिकच्या मासिक पाळी प्रकरणाला नवं वळण, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

नाशिक | नाशिक येथील आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीला मासिक पाळी (Periods) आल्याने शिक्षकांनी वृक्षारोपन करण्यास मनाई केली. त्यामुळे त्या मुलीने पालक, शाळा प्राचार्य आणि नंतर जिल्हा आयुक्तांकडे तक्रार केली होती.

मुलीच्या तक्रारीनंतर सदर घटनेचा महाराष्ट्राभरातून निषेध करण्यात आला होता. टिळक-आगरकर-फुले-शाहू- आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षक अशी सनातनी भूमिका घेतात, यावरुन राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला होता.

या घटनेची दखल राज्य महिला आयोगाने (State Women Commission) घेतली होती. आणि आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विरोध करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यास सांगितले होते.

याप्रकरणी आदिवासी आयुक्तांकडून (Adivasi Commissioner)चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशीअंती समितीने (Committee) सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुलीची ही तक्रार बनावट असल्याचे अहवालात समोर आले होते.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव शासकीय आश्रम शाळेत मागील आठवड्यात विद्यार्थीनीला मासिक पाळी आल्याने वृक्षारोपण करण्यास नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणी (Hiralal Sonvani) यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यावेळी शाळेचा हजेरीपट तपासला असता, त्यादिवशी वृक्षारोपन झाल्याची नोंद होती. परंतु सदर विद्यार्थीनी त्या दिवशी शाळेत आली नव्हती, असे अहवालात निष्पन्न झाले आहे.

सदर विद्यार्थीनी जून महिन्यात चार आणि जुलै महिन्यात फक्त तीन वेळा शाळेत आली होती, असे अहवालात उघडकीस आले आहे. सदर विदयार्थीनी ही एका आदिवासी विभागात काम करणाऱ्या राजकीय पक्ष संघटनेशी संलग्न आहे.

त्यामुळे तिची महाविद्यालयातील उपस्थिती कमी असल्याने शिक्षकांनी तिला परीक्षेला बसता येणार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्या भितीतून तिने हा बनाव केल्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना पक्षप्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”

“कोण आदित्य ठाकरे, तो फक्त एक आमदार आहे”

‘फक्त 11 लाखांसाठी का छळ चालवलाय?’, राऊतांवरील कारवाईवर जया बच्चन संतापल्या

संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, वाचा सविस्तर

भागवतांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले ‘मोहन भागवत मला आदर्श आहेत’