महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईत ‘राष्ट्रवादी’ला खिंडार?; 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर???

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज आहेत. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा एक गट भाजपमध्ये प्रवेशासाठी बैठक घेत असल्याचं पाहायला मिळतंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील 13 नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. 

15 जुलै रोजी राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात चांगल्याच चवीने चघळल्या जात आहेत.

मार्च 2020 ला नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. 

आघाडीत बिघाडी झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आधीच मोठा दणका बसला आहे, त्यातच आता हे 13 नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप कास धरणार असल्याच्या चर्चांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, संपूर्ण राज्यभरात सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भाजपमध्ये आऊटगोईंग सुरु आहे. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतशी ही आईटगोईंट मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. 

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच सोलापुरात बोलताना यासंदर्भात सुतोवाच केलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार येत्या काळात भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-पराभवानंतर पार्थ मतदारसंघात फिरकलेच नाहीत; अजित पवार म्हणतात…

-आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला निकाल आणि झुकलं पाकिस्तान; घ्यावा लागला ‘हा’ निर्णय

-113 एनकाउंटर करणाऱ्या प्रदीप शर्मांचा राजकारणात प्रवेश???

-कर्नाटक सरकारचं भवितव्य आज ठरणार

-अजित पवारांचा यू-टर्न, अखेर विरोधकांच्या सुरात मिसळला सूर!

IMPIMP