मुंबई | पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel) दरात मोठी वाढ झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी दिलासा दिला आहे.
आज दिल्ली-मुंबईसह देशातील चारही महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
तेल कंपन्यांनी गेल्या 10 दिवसांत पेट्रोलच्या दरात 6.40 रुपयांनी वाढ केली आहे, तर डिझेलच्या दरातही जवळपास तेवढीच वाढ झाली आहे.
दिल्लीत पेट्रोलचा दर 102 रुपये प्रति लिटरच्या आसपास पोहोचला आहे, तर मुंबईत पेट्रोल 117 रुपयांच्या आसपास पोहोचलं आहे. येथे डिझेलनेही 100 रुपयांची पातळी ओलांडली आहे. गेल्या काही दिवसांत कंपन्यांनी दररोज 80 पैशांहून अधिक वाढ केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर; ‘या’ तारखेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी
सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ‘या’ गोष्टी महागणार
“…म्हणून ईडीने धाड टाकली”, सतीश उकेंच्या अटकेनंतर नाना पटोलेंचे गंभीर आरोप
IPL 2022: ना मुंबई ना दिल्ली, मॅथ्यू हेडन म्हणतो ‘हा’ संघ यंदा IPL जिंकेल
IPL 2022: “RCB जिंकली तरी मला आनंद होणार नाही”; किंग कोहलीच्या वक्तव्यानं खळबळ