नवी दिल्ली | देशातील प्रत्येक शेतकऱ्याचे उतपन्न दुप्पट व्हावे आणि शेतकरी सर्व बाबतीत सधन व्हावा यासाठी केंद्र सरकार (Central Government of India) आग्रही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुकुल योजना राबविल्या जात आहेत.
योजनांसोबत शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणातही सूट देण्यात येत आहे. राज्य सरकारकडून घेतलेल्या तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर नियमित परतफेड केल्यास शून्य टक्के व्याजदर (0% Interest Rate) आहे.
आता केंद्राने एक आणखी नवा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीवर घेतलेल्या कृषीकर्जावर 1.5 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर योजनेत 2022 – 23 ते 2024 – 25 या कालखंडात 34 हजार 856 कोटी रुपये एवढी अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. संबंधीत माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी दिली आहे.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी देखील यापूर्वी माहिती देताना केंद्र सरकार कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत असल्याचे सांगितले होते.
सध्याच्या काळात शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड मिळू लागत असल्याने शेतकरी त्यामुळे आधुनिक दृषट्या सक्षम होत आहेच सोबक आर्थिक दृषट्या देखील प्रगती करत आहे.
महत्वाच्या बातम्या –
देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपने दिली मोठी जबाबदारी
काँग्रेसचे ‘हे’ बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
“महिलेचे कपडे उत्तेजक असतील आणि लैगिक छळ झाला, तर…” – न्यायालय
दरवाजे अद्यापही खुले आहेत, पण… आदित्य ठाकरेंची बंडखोरांना अट
रेवडी प्रकरण: आश्वासने देणे धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय