‘मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेची नवी खेळी’

मुंबई | शिवसेनेच्या गटप्रमुखांचा आज शिवसेना भवनात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बैठकीला संबोधीत करणार आहेत.

त्यामुळे ते या बैठकीत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या शिवसेनेत आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरुन वाद सुरु आहेत. त्यामुळे ठाकरे यावेळी काय मार्गदर्शन करणार, याची सर्वांना उत्सुक्ता आहे.

यावेळी नेहमीप्रमाणे ‘ठाकरे बूथ जिंका मुंबई जिंका’, असा नवा मंत्र शिवसैनिकांना देणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी शिंदे गट आणि भाजपविरोधात लढण्यासाठी उद्धव ठाकरे सज्जता करत आहेत.

भाजपने देखील 2014 सालापासून पन्ना प्रमुख आणि बूथ प्रमुख नेमून त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली होती. त्यामुळे शिवसेना देखील तशाच स्वरुपाची रणनीती आखत आहे, असे म्हणता येईल.

तसेच दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप शिवसेनेला परवानगी दिली नाही. आता शिवसेनेने त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

रामदास कदमांच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाल्या, तुमच्या बापाच्या…

दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला मोठा दणका देण्याचा एकनाथ शिंदेंचा डाव

लालबागचा राजा सार्वजनिक गणेसोत्सव मंडळाला मुंबई महानगरपालिकेचा साडेतीन लाख दंड; कारण त्यांनी…

पत्राचाळ घोटाळ्यात आपला सहभाग आहे का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर

खुशखबर! भारतीय पोस्टात ‘आठवी पास’ तरुणांना नोकरीची संधी