इलेक्ट्रीक वाहणांसाठी येत्या 1 ऑक्टोंबरपासून नवीन नियम; नितीन गडकरींची मोठी घोषणा

नवी दिल्ली | केंद्रीय अवजड वाहतूक आणि परीवहन मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) वाहनांसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. अध्यादेश काढून येत्या 1 ऑक्टोंबरपासून हे नियम लागू होणार असल्याचे मंत्रालयाने म्हंटले आहे.

हे नवे नियम इलेक्ट्रीक गाड्यांसाठी असणार आहेत. इलेक्ट्रीक गाड्यांत आग लागण्याच्या अनेक घटनांवर सरकारने ही नवीन उपाययोजना तयार केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.

केंद्र शासनाने इलेक्ट्रीक गांड्यांच्या (Electric Vehicles) बॅटरिला आग लागण्याचे कारण जाणून घेण्यासाठी आणि उच्त स्तरीय तपास करण्यासाठी एक समिती तयार केली होती. या विशेष समितीच्या अहवालावर आधारीत हे नवीन नियम असणार आहेत.

सदर समितीने 29 ऑगस्ट 2022 रोजी आपला अहवाल सादर केला. त्यानंतर सुरक्षेचे नवीन नियम बनविण्यात आले. त्यात L वर्गात मोडणाऱ्या, M आणि N वर्गात मोडणाऱ्या वाहनांसाठी नियम तयार केले आहेत.

L वर्गात चार पेक्षा कमी चाकांच्या गाड्या येतात. वर्ग M आणि N मध्ये चार चाकांच्या गाड्या येतात. या गाड्यांचा वापर वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील केला जातो.

नव्या नियमावलीत बॅटरी सेल, ऑन बोर्ड चार्जर, बॅटरी पॅक करण्याची डिझाईन आणि इंटरनल सेल शॉर्ट सर्किटमध्ये आग लागण्याच्या कारणांमुळे थर्मल ट्रांसफरच्या संबंधीत अधिक सुरक्षा घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

या नवीन नियमांत चालकासाठी धोक्याची घंडा (Safety Horn), सेफ्टी फ्यूज (Safety Fuse) आणि बॅटरी सेल्सच्या मध्ये अंतर अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. यामुळे आगामी काळात वाहनांना आणि बॅटऱ्यांना लागणाऱ्या आगी आटोतक्यात आणता येणार आहेत.

या नवीन नियमावलीत 4 जास्त सेंसर असणार आहेत. यामुळे बॅटरीत जर काही बिघाड झाला, तर त्याची सूचना मिळण्यास मदत होणार आहे. येत्या 1 ऑक्टोंबरपासून ही नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘या’ शेअरमध्ये एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 2.65 कोटी, वाचा सविस्तर माहिती

75 वर्षात कसा बदलला भारतीय नौदलाचा ध्वज, जाणून घ्या सविस्तर माहिती

INS Vikrant बद्दल ‘या’ 10 गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहितच हव्यात, अभिमान वाटेल!

पुण्यात आता उडत्या बस!, Nitin Gadkari यांनी सांगितली भन्नाट योजना

“2002 लोकसभा निवडणुकीपूर्वी संघाचा देशात बॉम्बस्फोट करण्याचा कट होता”; माजी प्रचारप्रमुखाचा मोठा दावा