नवी दिल्ली | Omicron BA.2 किंवा Steelth Omicron च्या रूपात परतला आहे. दक्षिण कोरियामध्ये सर्वात वाईट स्थिती पाहायला मिळत आहे. जिथं दररोज सुमारे पाच लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ओमिक्रॉन बीए. 2 सब व्हेरिअंट सर्वात वेगानं प्रसार होणारा व्हेरिअंट असल्याचं म्हटलं आहे.
तिसरी लाट संपल्यानंतर चीन, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, ब्रिटन सारख्या देशांमध्ये या नव्या व्हेरिअंटचा उद्रेक होऊ लागला आहे. आता या व्हेरिअंटनं भारतातही प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे.
Omicron चा सब व्हेरिएंट आता फुफ्फुसं नाही तर घशावर परिणाम करत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये श्वसननलिका आणि श्वसन प्रणाली यांच्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ताप, खोकला, डोकेदुखी, थकवा, घसा खवखवणं या लक्षणांव्यतिरीक्त आता अनेक वेगळी लक्षणंही दिसून येऊ लागली आहेत. ज्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता अजूनच वाढली आहे.
संशोधकांनी कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांच्या कान, नाक आणि घशाशी संबंधित तक्रारी जाणून घेतल्या. यामध्ये अधिकतर रूग्णांना घशाला सूज आल्याचं दिसून आलं होतं.
सामन्य घसा खवखवण्यापेक्षा ही समस्या वेगळी होती. जर असा त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
महत्त्वाच्या बातम्या –
‘एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत ऐकलं नाही तर…’; अजित पवारांचा इशारा
‘RRR’ चिटपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मोडले मागचे सगळे Records
…तर मला विजय चौकात फाशी द्या- सुप्रिया सुळे
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट