अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी

काबूल | अफगाणिस्तानवर सध्या तालिबानी दहशतवाद्यांची हुकुमत आहे. 20 वर्षांच्या संघर्षानंतर तालिबान अफगाणिस्तानात सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरलं आहे. त्यानंतर अफगाणमधील परिस्थिती बिकट होत आहे.

तालिबाननं सत्तेत आल्यापासून महिलांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. तालिबान राजवटमध्ये आता महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महिलांबाबत तालिबाननं आपले नियम अधिक कडक असणार आहेत, हे स्पष्ट केलं आहे. परिणामी आता तालिबान राजवटीत महिलांना एखाद्या कैद्यासारख वागवलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी महिलांना एकटीला बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता. महिलांना सार्वजनिक ठिकाणी काम करता येणार नाही, असं फर्मान तालिबाननं काढलं होतं.

तालिबाननं आता महिलांसाठी आणखीन कडक नियम जारी केले आहेत. महिलांना अफगााणिस्तानमध्ये लांबचा प्रवास एकट्यान करता येणार नाही. त्यासाठी त्यांना सोबत एकतरी नातेवाईक पुरूष असणं बंधनकारक असणार आहे.

अफगाणिस्तानमधील महिलांना 72 किमीच्या पुढील प्रवास करायचा असेल त्यांना सोबत कोणीतरी घरातील पुरूष असणं बंधनकारक असणार आहे, असं तालिबानचे प्रवक्ते सादिक अकीफ मुहाजिर यांनी म्हटलं आहे.

प्रवास करताना महिलेला हिजाब परिधान करणे हे बंधनकारक असणार आहे. अन्यथा महिलेला प्रवास करण्यास बंदी असेल. प्रवासावर आणि प्रवास वाहतूक देण्यासही बंधन असणार आहे, असंही तालिबान प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महिलांना तालिबान कैदेत ठेवत आहे, अशी टीका तालिबान राज्यकर्त्यांवर मानव अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. अफगाणमध्ये मानव अधिकारासाठी काम करणाऱ्या हीदर बार यांनी तालिबानच्या या महिलांबाबतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून नागरिकांना प्रचंड काही सोसावं लागत आहे. त्यात तालिबानच्या अशा निर्णयांमुळं नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा