Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता एनसीबी विरोधातच ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल

मुंबई | गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात सुशांत प्रकारणानं खळबळ माजवली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनं त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. सुशांतच्या मृ.त्यूचा शोध घेण्यासाठी देशातून अनेकांनी आवाज उठवला. सुरुवातीला मुंबई आणि बिहार पोलीस याप्रकरणी शोध घेत होते. मात्र, सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी, अशी देशभरातून मागणी होऊ लागली.

यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सुशांत प्रकरण सोपविलं. गेल्या कित्येक महिन्यांपासून सीबीआय सुशांत प्रकरणी शोध घेत आहे. सुशांत प्रकरणी सीबीआयच्या तपासादरम्यान अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील याप्रकरणी तपास करत आहे.

एनसीबीनं अं.मली पदार्थ प्रकरणी अनेकांवर का.रवाई केली आहे. सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला ता.ब्यात घेतलं होतं. तसेच रिया बरोबरच एनसीबीनं सुशांतच्या घरी काम करणाऱ्या सॅम्युअल मिरांडाला देखील ताब्यात घेतलं होतं.

सुशांत सिंह राजपूतसाठी ड्र.ग्ज खरेदी करण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयानं सॅम्युअलचा जामीन मंजूर केला होता. यामुळे तो जेलमधून बाहेर आला आहे. जेलमधून बाहेर येताच सॅम्युअलनं एनसीबी विरोधातच गु.न्हा दाखल केला आहे.

एनसीबीनं बेकायदेशीररित्या आपल्याला अट.क केल्याचा आरोप त्यानं एनसीबीवर केला आहे. सॅम्युअलनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत एनसीबीला 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

तसेच अट.केनंतर 24 तासाच्या आत कोर्टात हजर करावं लागतं. मात्र, एनसीबीनं आपल्याला 36 तासांपेक्षा अधिक काळ लोटून गेल्यानंतर न्यायालयात हजर केलं होतं, असाही आरोप सॅम्युअलनं एनसीबीवर केला आहे.

दरम्यान, एनसीबीनं 8 सप्टेंबरला रिया चक्रवर्तीला ता.ब्यात घेतलं होतं. अं.मली पदार्थ प्रकरणी ग.जाआड गेलेल्या रियाचा न्यायालयानं 28 दिवसांनतर जामीन मंजूर केला होता. न्यायालयानं रियाचा सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर रिया बाहेर आली आहे. रिया बाहेर येताच तिच्या वकिलांनी रिया चक्रवर्तीला बदनाम करणाऱ्यांना आपण सुट्टी देणार नसल्याचं म्हटलं आहे.

रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी एक वक्तव्य जारी केलं होतं. मी म्हटलं होतं की, एकदा रिया जामिनावर बाहेर आली तर आम्ही त्या लोकांच्या मागे लागू ज्यांनी रियाला बदनाम केलं आहे. दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी ज्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आधार घेत रियाला टार्गेट केलं त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करू, असं सतीश माने शिंदे यांनी आता म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडेंना पाहून का रडत आहेत ‘हे’ आजोबा? वाचा सविस्तर

अखेर खडसेंचं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ठरलं! सर्व समर्थकांना ‘या’ मुहूर्तावर मुंबईत येण्याच्या सूचना?

नाथाभाऊंची राष्ट्रवादी प्रवेशाची ती वार्ता चुकीची, ते भाजपमध्येच राहतील?

‘या’ व्यक्तीने सातासमुद्रापार आपल्या मातृभाषेची किर्ती उंचावली; वाचा सविस्तर

स्वतःचाच ‘तो’ विक्रम मोडत शिखर धवन ठरला ‘चौकार किंग’!

IMPIMP