खुशखबर!!! कोरोनाच्या पहिल्या लशीला मंजुरी, पुढील आठवड्यात नागरिकांसाठी होणार उपलब्ध

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोना महामारीमुळे लोकांचं आयुष्य जणू एकाच जागी थांबलं आहे. या महामारीवर लस केव्हा येणार? या एका गोष्टीकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच आता नागरिकांसाठी एक मोठी खुशखबर आहे.

ब्रिटन या देशाने व्यापक वापरासाठी बनवलेल्या ‘फायझर-बायोएनटेक’च्या कोरोना व्हायरसवरील लसीला मंजुरी दिली आहे. कोरोना व्हायरसवरील लस मंजूर करणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश बनला आहे.

पुढील आठवड्यात ब्रिटन मधील लोकांना ही लस देण्यात येणार आहे. अमेरिकी फार्मा कंपनी ‘फायझर’ आणि जर्मन कंपनी ‘बायोएनटेक’ या कंपन्यांनी एकत्र मिळून ही लस बनवली आहे.

या लसीविषयी माहिती देताना ब्रिटन सरकारने म्हटले आहे की, स्वतंत्र औषध आणि आरोग्य सेवा नियामक एजन्सीची शिफारस स्वीकार करत सरकारने फायझर-बायोएनटेक च्या कोव्हिड-19 व्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. संपूर्ण युकेमध्ये पुढील आठवड्यापासून ही लस उपलब्ध होणार आहे.

तसेच कोरोना वरील या लसीवर स्वतंत्र औषध आणि आरोग्य सेवा नियामक एजन्सीने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, कोरोनावर 95 टक्के सुरक्षा देणारी ही लस पुढील आठवड्यात रोल आउट करणं सुरक्षित आहे.

केअर होम मधील नागरिकांना लसीची सर्वात जास्त गरज आहे. त्यांच्यासाठी लसीकरण काही दिवसांतच सुरु होऊ शकतं, असंही स्वतंत्र औषध आणि आरोग्य सेवा नियामक एजन्सीने म्हटलं आहे.

तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील य लसीबाबत आनंद व्यक्त केला आहे. बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट करत या लसीच्या वितरणाबाबत  युकेतील नागरिकांना खुशखबर दिली आहे.

बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोव्हिड -19 साठी एमएचआरएने औपचारिकपणे ‘फायझर-बायोएनटेक’चे व्हॅक्सिन अधिकृत केले आहे. पुढील आठवड्यापासून ही लस संपूर्ण युकेमध्ये उपलब्ध करण्यास सुरवात होईल.

दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. यामुळे युकेतील नागरिकांप्रमाणे भारतातील नागरिकांना लस केव्हा मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला आज रुग्णालयात दाखल केलं जाणर, उद्या होणार मोठी शस्त्रक्रिया

‘काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये मी तुला..’; पंजाबच्या आजींची कंगनाला जबरदस्त ऑफर!

सात दिवसात माफी माग नाहीतर…; कंगणा राणावत पुन्हा अडकली नव्या वादात

‘त्यावेळी सर्वकाही व्यवस्थित होतं पण…’; सुशांत प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी प्रथमच मौन सोडलं

Whatsapp वरील डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? मग ही भन्नाट ट्रिक वापरा