पायल घोषला ‘ते’ वक्तव्य महागात पडणार? कोर्टानं पायलच्या विरोधात दिला निर्णय

मुंबई | अभिनेत्री पायल घोषनं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लै.गिं.क छ.ळाचा आ.रोप केला होता. अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाले होते, असं म्हणत पायलनं अनुरागवर अनेक गं.भीर आ.रोप केले होते. पायल घोषनं 22 सप्टेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरुद्ध दखलपात्र गु.न्हा देखील दाखल केला होता.

यानंतर पायलनं एका मुलाखती दरम्यान ऋचा चड्ढाच नाव घेत अनुरागनं आपला विनयभं.ग केल्याचं म्हटलं होतं. अनुरागनं मला घरी बोलावून न.शेत माझ्यावर जबरदस्ती केली. जेव्हा मी त्याला विरोध केला तेव्हा अनुरागनं ऋचा चड्ढा, माही गील, हुमा कुरैशी यांसारख्या अभिनेत्रींची नावं घेतली होती, असं पायलनं या मुलाखती दरम्यान म्हटलं होतं.

पायलला मुलाखती दरम्यान ऋचाचं नाव घेणं फारच महागात पडलं आहे. पायलनं केलेल्या वक्तव्यानंतर ऋचानं तिच्याविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात मानहा.नीचा दावा दाखल केला आहे. न्यायालयानं ऋचाच्या याचिकेवर आता सुनावणी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं ऋचाच्या बाजूने निकाल दिला असल्याचं ऋचाने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरून सांगितलं आहे. ऋचाने इन्स्टाग्रामवर न्यायालयाच्या निर्णयाची कॉपी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

आपण जिंकलो आहोत. सत्यमेव जयते! मी मुंबई उच्च न्यायालयाची आभारी आहे. न्यायालयाचा हा निर्णय आता हाय कोर्टच्या वेबसाईटवरील सार्वजनिक रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही केलेल्या सहकार्यासाठी धन्यवाद, असं कॅप्शन ऋचानं या पोस्टसोबत दिलं आहे.

याप्रकरणी पुढील सुनावणी 12 ऑक्टोबरला होणार आहे, अशीही माहिती ऋचानं या पोस्टमध्ये दिली आहे. ऋचानं इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केल्यानंतर पायल घोषनं ऋचा खोट बोलत असल्याचा आ.रोप केला आहे. पायलनं यासंबंधीत एक ट्विट केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं याप्रकरणी अद्याप निर्णय राखून ठेवलेला असताना मिस चड्ढा जिंकल्याचा दावा कसा करू शकतात? 12 ऑक्टोबरला याप्रकरणी न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. मात्र, ऋचा त्यापूर्वीच खोटा दावा करत आहे, असं ट्विट पायलनं केलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय 12 ऑक्टोबरला काय निर्णय देतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी सोशल मीडियावर ऋचाची इन्स्टाग्राम पोस्ट आणि पायलचं ट्विट वेगानं व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हाथरस प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती उघड, पीडितेची वहिनी म्हणून आलेली ती…

भीक मागितली, झाडून घेतलं; आता 150 लोकांना काम दिले, इतक्या कोटींची कमाई!

सलमानबर काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीनं चित्रपट सृष्टीला केलं अलविदा

धक्कादायक! सुशांत प्रकरणी तपास करणाऱ्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात त.क्रार दाखल!

रेखानं ‘या’ कारणाने बहिणीला चित्रपट सृष्टीत येवू दिलं नाही