सुशांत प्रकरणी एनसीबीचा धक्कादायक खुलासा! सुशांतच्या मृ.त्यूशी ‘या’ व्यक्तीचा संबंध असू शकतो

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीसह देशातील राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. मुंबई आणि बिहार पोलीसांनंतर सीबीआय आणि एनसीबीसारख्या देशातील उच्च दर्जाच्या एजन्सी याप्रकरणी शोध घेत आहेत. अशातच आता सुशांत प्रकरणी एनसीबीच्या हाती मोठा पुरावा लागल्याची माहिती मिळाली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृ.त्युच्या काही दिवस अगोदर युरोप टूरसाठी गेला होता. ही टूर अर्ध्यात सोडून सुशांत सिंह राजपूत मुंबईला पुन्हा परतला होता. मुंबईला परतल्यानंतर सुशांत थेट मुंबईतील अंधेरी येथे असणाऱ्या वॉटर स्टोअर रिसोर्टमध्ये थांबला होता.

एनसीबीनं आता या रिसोर्ट मधील कर्मचार्यांची चौकशी केली आहे. यावेळी एनसीबीला चौकशी दरम्यान आतिशय महत्वाची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत रिसोर्टमध्ये थांबला होता त्यावेळी एक फिल्ममेकर सतत सुशांतला भेटण्यासाठी येत होता. एनसीबी सध्या हा फिल्ममेकर कोण होता?, याचा शोध घेत आहे.

एनसीबीच्या मते सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं आणि बॉलीवूड मधील ड्र.ग्ज कनेक्शनचा काहीतरी संबंध आहे. हाच संबंध शोधून काढण्याचा एनसीबीची टीम प्रयत्न करत आहे. लवकरच एनसीबी त्या फिल्ममेकर सोबत बॉलीवूड मधील ईतरही काही लोकांना चौकशीसाठी बोलावू शकते.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच सुशांत प्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सुशांत प्रकरणी रियावर अनेक आ.रोप करण्यात आले होते. एनसीबीला रिया विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केली होती. 29 दिवसांच्या को.ठडीनंतर रिया नुकतीच बाहेर आली आहे.

रिया चक्रवर्ती हिने सप्टेंबरमध्ये सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल केली होती. सुशांतच्या बहिणी सुशांतला कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषध देत असल्याचा आरोप रिया चक्रवर्तीनं केला होता.

या औषधांमुळे सुशांत सिंह राजपूतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता, असंही रियानं दिलेल्या त.क्रारीत म्हटलं होतं. रियाने दाखल केलेल्या एफआयआरची प्रत मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे नुकतीच सोपविली होती. मात्र, सीबीआयनं बॉम्बे हायकोर्टात रियानं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

रिया चक्रवर्तीनं सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींवर जे आरोप लावले आहेत ते सर्व आरोप काल्पनिक आहेत. तसेच रियानं कोणत्याही पुराव्याविना बिनबुडाचे आ.रोप केले आहेत, असं सीबीआयनं कोर्टात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सच्या टीमसह समर्थकांना मोठा झटका! मुंबईची टीम प्ले ऑफमध्ये नाही?

प्रेक्षकांना भुरळ घालणारी रेखाची ‘ती’ भूमिका आता श्रद्धा साकारतेय; वाचा सविस्तर

विराट कोहलीने मैदानातून अनुष्काला विचारला ‘तो’ प्रश्न; प्रेक्षक झाले हैराण!

कंगना राणावतला अट.क होणार? न्यायालयाने कंगना विरुद्ध पोलिसांना दिले महत्वाचा आदेश

‘बिहार प्रचारात मला धमकावत माझ्यावर बला.त्कार…’; ‘या’ अभिनेत्रीचा बड्या नेत्यावर धक्कादायक आरोप!