सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या वकिलांनी केला ‘त्या’ प्रायव्हेट गोष्टीचा खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांनंतर सीबीआय आणि एनसीबी सारख्या उच्च दर्जाच्या एजन्सी शोध घेत आहेत. मात्र, तरीही सुशांत प्रकरणातील गुंता वाढतंच जात आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ घातली आहे. सुशांतच्या मृ.त्युनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीसह देशातील काही राजकीय नेत्यांवर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी अनेकजण रोज नवनवीन खुलासे करत आहेत. अशातच आता रिया चक्रवतीचे वकील सतीश माने शिंदे यांनी 8 जूनला रियानं सुशांतचे घर का सोडले? या गोष्टीचा खुलासा केला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या दोन्ही बहिणी सुशांतलाच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज असताना देखील त्याला चुकीची औषधे देत होत्या. 8 जूनला प्रियंका सिंह हिने सुशांतला मेसेज करून काही औषधे सांगितली होती. ती औषधे प्रिस्क्रिप्शन शिवाय रुग्णाला देता येत नाहीत तो गु.न्हा ठरतो, असा आरोप सतीश माने शिंदे यांनी सुशांतच्या बहिणीवर केला आहे.

तसेच सुशांतची मानसिक स्थिती पाहता जवळपास पाच डॉक्टरांनी सुशांतला ड्र.ग्ज घेणं बंद करण्यास सांगितलं होतं. तरीही सुशांत ड्र.ग्ज घेणं थांबवत नव्हता. रियानंही याविषयी सुशांतला खूप समजावलं होतं. मात्र, सुशांतनं डॉक्टरांचा आणि रियाचा सल्ला न ऐकल्यानं रियाने 8 जूनला सुशांतचे घर सोडले, असा खुलासा सतीश माने शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुशांतच्या बहिणी प्रियंका आणि मितू सिंह सुशांतला कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषध देत असल्याचा आरोप रिया चक्रवर्तीनं केला आहे.

8 जूनला सुशांतने बहिणीसोबत केलेलं चॅटिंग मला दाखवली होती. सुशांतच्या बहिणीने त्याला काही औषधे घ्यायला सांगितली. सुशांतची बहिण दिल्लीतील डॉक्टरांच्या मदतीने सुशांतला प्रतिबंधक औषधे देत होती, असं रियानं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सुशांतच्या मानसिक आरोग्यावर यामुळे परिणाम होत होता, असा आरोप रियाने एफआयआरमध्ये केला आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं तू घ्यायला हवी. बहिणीने सल्ला दिलाय म्हणून औषधे घेऊ नकोस कारण तिच्याकडे मेडिकल डिग्री नाही, असंही रियानं यावेळी सुशांतला बजावलं होतं.

प्रियंका आणि मीतू यांनी ही तक्रार रद्द व्हावी यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. मात्र हा गु.न्हा रद्द करण्यास मुंबई पोलिसांनी विरोध केला आहे. याप्रकरणी मुंबई हाय कोर्टात मुंबई पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात रिया चक्रवर्तीने दाखल केलेली तक्रार रद्द होऊ नये, अशी मागणी मुंबई पोलिसांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘इथे तुमचे हातवारे चालणार नाहीत’; गोस्वामींना खडसावत न्यायाधिशांनी तब्बल 10 तासाने केली सुनावणी

सुशांत प्रकरणी ‘ती’ खेळी शरद पवारांचीच?; ‘सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनविण्यासाठी बेस तयार केला जातोय’

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतच्या बहिणींविरोधात मुंबई पोलिसांचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

अर्णब गोस्वामी यांच्या अ.टकेनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य! म्हणाले राज्यात पत्रकारितेला…

दिल्लीच्या संघाने केलेल्या ‘या’ चुकीमुळे कोलकत्ता टीम आयपीएल बाहेर गेली!