Top news मनोरंजन

धक्कादायक! सुशांत प्रकरणी तपास करणाऱ्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात त.क्रार दाखल!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यू प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर सीबीआय, ईडी आणि एनसीबी सारख्या तीन उच्च दर्जाच्या एजन्सी याप्रकरणी शोध घेत होत्या. तरीही सुशांत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला होता.

मात्र, आता अखेर सुशांत प्रकरणातील गुंता सुटताना दिसत आहे. सुशांतच्या मृ.त्युप्रकरणी शोध घेण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाची मेडिकल टीमसुद्धा सीबीआयला मदत करत होती. एम्स रुग्णालयाच्या मेडिकल टीमनं अखेर सुशांत प्रकरणाचे मेडिकल अहवाल सीबीआयकडे सोपविले आहेत.

सुशांतच्या सर्व फॉ.रेन्सिक रिपोर्टची फेरतपासणी करत सुशांत सिंह राजपुतची ह.त्या झाली नाही तर सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं सीबीआयला दिला आहे. मात्र, एम्सनं दिलेल्या रिपोर्टवर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. अशातच आता सुशांतच्या कुटुंबाने एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या विरोधात त.क्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुशांतचा फॉ.रेन्सिक रिपोर्ट लीक केल्याचा आ.रोप सुशांतच्या कुटुंबाने केला आहे. याबाबत सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलांनी सीबीआयला एक त.क्रार पत्र दिलं आहे. तसेच या पत्रात एम्सच्या टीमवर आणखीही काही आ.रोप करण्यात आले आहेत.

एम्सने सादर केलेला अहवाल अपुऱ्या पुराव्यांवर आधारित आहे. एम्स रुग्णालयाला या रिपोर्टची प्रत मागून देखील रुग्णालयाकडून दिली जात नाही, असा आ.रोप सुशांतच्या कुटुंबाने केला आहे.

तसेच केवळ कुपूर रुग्णालयाच्या अहवालावरच हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. ज्या अहवालात सुशांतच्या आ.त्मह.त्येच्या वेळेचा उल्लेख देखील नाही त्या रिपोर्टच्या आधारावर हा अहवाल निष्कर्षावर कसा पोहचू शकतो, असंही सुशांतच्या कुटुंबाने सीबीआयकडे सोपविलेल्या त.क्रार पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सीबीआय सध्या सुशांतच्या आ.त्मह.त्येच्या बाजूने तपास करत आहे. मात्र, सीबीआयच्या तपासात अशी कोणतीही गोष्ट आढळली नाही की ज्याच्यावरून सुशांतनं रिया चक्रवर्तीमुळे आ.त्मह.त्या केली आहे हे स्पष्ट होईल, अशी माहिती समोर आली आहे.

तसेच रिया चक्रवर्तीनं सुशांतचे पैसे खर्च केल्याचं बोललं जात होतं. मात्र, गेल्या पाच वर्षांत 70 कोटी रुपयांतील 55 लाख रुपये सुशांतनं रियासाठी खर्च केल्याचं सीबीआयच्या तपासात समोर आलं आहे. परंतु हे पैसे केवळ ट्रिप्स, स्पा आणि गिफ्ट्स यासाठी वापरण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

रेखानं ‘या’ कारणाने बहिणीला चित्रपट सृष्टीत येवू दिलं नाही

सुशांत प्रकरणी बोलताना आता उर्वशीनंही सांगितलं पडद्यामागचं सत्य म्हणाली…

रेखा सध्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते? वाचा काय म्हणाली होती रेखा

चित्रपट सृष्टीवर पुन्हा पसरली शोककळा! आणखी एका बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

आता कंगणा राणावत नव्या वादात; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश