वॉट्सएपचे नवीन अपडेट देणार आहे ‘हे’ नवीन फिचर्स; सर्वांना याचीच प्रतीक्षा होती

नवी दिल्ली | वॉट्सएप (WhatsApp) दरवेळी एक अपडेट (New Update of WhatsApp) आणि त्यात नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. आता देखील येणाऱ्या वॉट्सएप अपडेटमध्ये वापरकर्त्यांना एका वेगळ्या आणि मजेदार फिचर्सची सेवा वॉट्सएप देणार आहे.

वॉट्सएपच्या नवीन फिचर्सनुसार आता पाठविलेला संदेश (Message) एडीट (Edit) करता येणार आहे. WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे. यावर सध्या काम सुरु आहे. (WhatsApp sent Message can be edited)

हे फिचर्स त्यावेळी भरपूर कामाचे असेल, जेव्हा आपण घाईघाईत एखादा चुकीचा संदेश टाईप करुन पाठवितो. WB च्या माहितीनुसार हे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या नवीन फिचर्सला वॉट्सएप बीटा 2.22.20.12 अपटेडमध्ये सामाविष्ट केले जाणार आहे.

अद्याप हे फिचर्स कसे काम करणार, याची कोणतीही माहिती उपल्बध नाही. पण आगामी काळात ती लवकरात लवकर उपल्बध होण्याचा संभव आहे. प्राप्त माहितीनुसार सेंट (Sent Message) केलेल्या संदेशासोमर एडीटचा ऑप्शन येणार आहे. परंतु एडीट करण्यासाठी काही मर्यादीत कालावधी (Time limit for edit the message) दिला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“…तर महाराष्ट्रातील महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पूजा करील” – भास्कर जाधवांची मोठी टीका

भाभा अणुसंशोधन केंद्रात मोठी भरती; 56100 ते 78800 प्रतिमहा पगारासाठी जागा रिक्त

मोठी बातमी: संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत मोठी माहीती समोर

दसरा मेळाव्याबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले शिवाजी पार्क आणि…

2024 साठी भाजपेत्तर पक्षांच्या युतीवर शरद पवार म्हणाले; काँग्रेसला सोबत घेऊ नये…