Top news विदेश

चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, अत्यंत धक्कादायक बातमी समोर

corona deth 3

मुंबई | चीनने जगाची चिंता वाढवली आहे. याचं कारण म्हणजे चीनमध्ये करोनाचा नवा उपप्रकार आढळला आहे. हा उपप्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटचा आहे.

चीनमध्ये एका दिवसात 13 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. यामुळे सर्वांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

शांघाईपासून 70 किमीपेक्षा कमी अंतरावर असलेल्या शहरातील सौम्य लक्षणं असणाऱ्या एका कोरोना रुग्णापासून हा नवा उपपक्रार विकसित झाल्याची माहिती समोर आली आहे.

उपप्रकार चीनमधील कोरोना किंवा GISAI, जिथे जगभरातील शास्त्रज्ञ उत्परिवर्तनांचं निरीक्षण करण्यासाठी त्यांनी सिक्वेसन्स केलेला कोरोना व्हायरस शेअर करतात त्यांच्याकडे सादर केलेल्या इतर करोना व्हायरसशी जुळत नाही, अशी माहिती अहवालातून समोर आलीये.

डालियान शहरातही शुक्रवारी नोंदवण्यात आलेल एक प्रकरणदेखील देशांतर्गत आढळलेल्या कोणत्याही कोरोना व्हायरसशी जुळत नाही, अशी माहिती पालिकेने WeChat वर दिली आहे.

दरम्यान, चीनमधील शांघाय शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने भयंकर रूप धारण केलं आहे. शांघायमधील अनियंत्रित कोरोना विषाणूमुळे चीन तणावात आला असून त्याने लष्कर तैनात केल्याची माहिती समोर आलीये.

एवढंच नाही तर हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना शांघायला पाठवण्यात आले आहेत जेणेकरून शहरातील 26 कोटी लोकांची चाचणी करता येईल.

चीनच्या लष्कर पीएलएने रविवारी देशभरातून 2 लष्करी डॉक्टरांना शांघायला पाठवलं आहे. चीनच्या इतर प्रांतातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही शांघायला पाठवण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे शांघायमध्ये दररोज हजारो केसेस येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू” 

सर्वात मोठी बातमी! HDFC ने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा 

जिओचा धमाका प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फ्री कॉलिंग आणि बरंच काही… 

“गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली होती पण…”

युक्रेनमधून भयंकर बातमी समोर, युक्रेनच्या मंत्र्याचा अत्यंत धक्कादायक दावा